Gadchandur : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडचांदूर भाजप शहर मंडळाच्या वतीने गुरुवारी(दि.५ जून)विज्ञानगरी,प्रभाग क्र.४ येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे, कार्यक्रमाचे संयोजक सतीश बेतावार व सहसंयोजक गणेश आदे यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास शहर उपाध्यक्ष अरविंद कोरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष विवेकानंद उरकुडे,महिला मोर्चा जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे,कोरपना तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्मिता चिताळे, शहर महिला आघाडी उपाध्यक्षा जयाताई लोहे,कोषाध्यक्षा अपर्णा उपलेंचवार,सदस्य पौर्णिमा आवळे,शालिका बेले तसेच गणपत बुरटकर,विनोद इंगळे,देवीदास पेंदोर,देरकर साहेब,सचिन चुरे,गणेश आदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वृक्षारोपणाबरोबरच लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी संबंधित कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली.पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळाला पर्यावरणीय सलामी अर्पण करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
#World Environment Day 2026.#Gadchsndur City BJP.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
.

