Chandrapur : जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार परिसरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.प्राप्त माहितीनुसार,तेंदुपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या.त्याठिकाणी दबाधरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला असून सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.Tigress Attack in Chandrapur.
'राज्यातील ही पहिलीच घटना?'
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी 4 महिलांच्या मृत्यूची घटना,जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही धक्कादायक घटना गुंजेवाही-पवनपार,या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडली असून सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी आहे.त्या सर्व महिला भट्टी मोहल्ला वॉर्ड क्र.1 येथे राहतात.कविता दादाजी मोहुर्ले वयवर्ष 45,अनिता दादाजी मोहुर्ले वयवर्ष 46,संगीता संतोष चौधरी वयवर्ष 40 आणि सुनीता कौशिक मोहुर्ले वयवर्ष 35,अशी मृत महिलांची नावे असल्याचे कळते.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिक दहशतीत असल्याचे चित्र आहे.वाघाचा बंदोबस्त कराव,अशी मागणी होत आह.
#Tigress Attack in Chandrapur District.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
