Korpana : तालुक्यातील गडचांदूर-भोयगाव मार्गावर कवठाळा गावा नजीकच्या 'जयहिंद कॉटन जिनींग'जवळ 13 मे रोजी सायंकाळी अंदाजे 6.30 च्या दरम्यान झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार एका तरूणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर आहेत.श्रेयश गुरुदास झोडे वयवर्ष 17 रा.चकफुटाना ता. पोंभूर्णा,असे मृत तरूणाचे नाव असून वेदांत महेश ढुमणे वयवर्ष 17,हा जखमी आहे.त्याच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून शाळेला सुट्ट्या असल्याने हे दोन्ही तरूण मामाच्या गावी कोरपना तालुक्यातील कोराडी येथे आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार,घटनेच्या दिवशी हे दोन्ही तरूण सायंकाळी कवठाळा येथे कामाने जावून येतो,असे सांगून रॉयल इनफिल्ड बुलेट क्र.MH/34/CU/0493,या दुचाकीने गेले असता सायंकाळी 7 च्या सुमारास कवठाळा गावाजवळील जयहिंद कॉटन जिनींगजवळ यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती मामाला मिळाली.तेव्हा ते घटनास्थळी गेले असता,दोघेही रोडच्या कडेला जखमी अवस्थेत पडून दिसले.दोघांच्याही डोक्याला मार लागून रक्तस्त्राव होत होता.तसेच रोडच्या कडेला दुचाकी पडून दिसली व ट्रक क्र.MH/40/BL/5976,हा ट्रक सुध्दा जिनींगच्या गेटकडे उभा दिसला.त्यानंतर लगेच तेथील लोकांच्या मदतीने दोन्ही जखमींना एका खासगी वाहनाने उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथे तपासाअंती डॉक्टरांनी श्रेयशला मृत्यू घोषीत केले.वेदांत जखमी असल्याने त्याला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.सदर अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आरोप करण्यात आले असून अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता.पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सुरू आहे.
#Shocking incident.#Truck-Bike Accident.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
