Chandrapur Crime news : हॉटेलवरच चालायचा वेश्याव्यवसाय; LCB ने सापळा रचला अन् थेट छापा!| Marathi News.

News@Crime...

 Chandrapur : 'हॉटेल रिलॅक्स'मध्ये हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा(LCB)ने पर्दाफाश केला आहे.सदर ठिकाणी थेट छापा टाकत 2 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.16 मे रोजी LCB च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की,'रिलॅक्स हॉटेल,रूम & लॉजिंग वडगाव,येथे हस्तक नावाचा व्यक्ती हॉटेलमध्ये 2 ते 3 महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहे,या माहितीवरून LCB चे अधिकारी व अंमलदारांनी  LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात बनावट कस्टमर पाठवून महिला पंच,सोशल वर्कर व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर,येथील स्टॉफसह छापा टाकून आरोपी सावजी पांडूरंग हस्तक वयवर्ष 74 रा.वडगाव,याला ताब्यात घेतले तर आरोपी प्रदिप सावजी हस्तक वयवर्ष 30 रा.वडगाव,फरार आहे.हे दोघेही 2 महिलाकडून वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने पंचनामा करून आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.आरोपीकडून मोबाईल,रोख रक्क्म,कंडोम बॉक्स,रजिस्टर आणि क्यु आर कोड, असा एकूण 7 हजार,400 रूपयेचा मुद्देमाल जप्त करून  2 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.

  सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.सुनिल गौरकार,सफौ.धनराज करकाडे, पोहवा.चेतन गज्जलवार,पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.कर्तिक खनके,पोशि.किशोर वाकाटे,पोशि.प्रफुल्ल गारघाटे,पोशि.सुमित बरडे,मपोहवा.छाया निकोडे,मपोहवा.निराशा तितरे,मपोहवा. विजयमाला वाघमारे,मपोशि.अपर्णा मानकर,चापोहवा.प्रमोद डंभारे,मिलिंद टेकाम,अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर,यांनी केली आहे.

#Chandrapur Crime News.

                                       $$$$$$$$$$$$$$$$$$$$$