Tobacco Raid in : सुगंधित तंबाखू जप्त;आरोपी फरार.!|Marathi News.

News@Crime...

     Gadchandur : जिल्हा पोलीस अधीक्षक,यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचे सत्र सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर 19 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा (LCB)चे पथक कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नांदा फाटा येथे छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू,गुटखा,पान मसाला विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्याच्या घरी छापा टाकून एकूण 22 वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित तंबाखू,गुटखा आणि पान मसाला किंमत अंदाजे 1 लाख,39 हजार  942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान आरोपी समीर सागीर अहमद सिद्दीकी रा.नांदा ता.कोरपना,फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB चे सपोनि.बलराम झाडोकार,अजय बागेसर,किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे इतरांनी केली आहे.

                                 'नागरिकांना आवाहन.' 

             जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित अंमली पदार्थ, सुगंधित तंबाखू अथवा गुटख्याची बेकायदेशीर विक्री किंवा साठवणूक होत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

#Crime News.#Tobacco Raid in Gadchandur.#Action by LCB Chandrapur.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$