The seized liquor was destroyed : जप्त दारू साठ्यावर फिरवला रोड रोलर!|Marathi News.

News@Crime..

Chandrapur : पोंभूर्णा पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत मागील सहा वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १४ लाख ५८ हजार ५१० रुपयांचा अवैध दारू साठा नष्ट केला.पोंभूर्णा पोलीस ठाण्यासमोरील सिमेंट रस्त्यावर दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर फिरवून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.The Seized Liquor was Destroyed.

      पोंभूर्णा पोलीस ठाण्यात वर्ष २०२० ते २०२६ या कालावधीत नोंद झालेल्या एकूण ८५ गुन्ह्यांमधील जप्त दारू साठ्यामध्ये ३९४ पेट्या व ११ किरकोळ देशी दारूच्या बाटल्या तसेच ५ पेट्या व ६ किरकोळ विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता.या मुद्देमालाची एकूण किंमत १४ लाख ५८ हजार ५१० रुपये इतकी होती.राज्य उत्पादन शुल्क विभाग,चंद्रपूर यांच्या कार्यालयीन आदेश क्रमांक डीईटी ११२०२५/ज.मु.वि./१३१४/शाखा-३, दिनांक २० मे २०२६ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यास परवानगी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलीस ठाण्यासमोरील मुख्य सिमेंट रस्त्यावर सर्व दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या व त्यावर रोड रोलर फिरवून त्या नष्ट करण्यात आल्या.त्यानंतर रिकाम्या बाटल्या व फुटलेल्या काचेचा चुरा सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावण्यात आली.सदर प्रक्रिया पोंभूर्णा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.टी.धीडसे,पोलीस कर्मचारी तसेच अधिकृत पंच यांच्या उपस्थितीत पार पडली.

        संपूर्ण कारवाईचा विधिवत पंचनामा करण्यात आला असून पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्रणही करण्यात आले.तसेच या कारवाईची नोंद पोंभूर्णा पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मुल उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO)सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि.राहुल ठेंगणे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

#Chandrapur District Crime News. #The Seized Liquor was Destroyed.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$$