Chandrapur : जिल्ह्यातील मूल-सावली रोडवरील खेडी चौकाजवळ गुरुवारी(दि.4 जून),दुपारच्या सुमारास एक 55 वर्षीय दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला.संबंधित व्यक्तीच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.Shocking incident.
मिळालेल्या माहितीनुसार,सदर व्यक्ती मूल येथून दुचाकीने सावलीकडे जात होती.दरम्यान,या मार्गाने प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला पाहून,तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.उपस्थितांपैकी काहींनी त्याची ओळख मूल येथील कापड व्यावसायिक रहमान भाई,अशी पटविली. जखमी अवस्थेतील व्यक्तीला तातडीने शासकीय रुग्णालय सावली,येथे हलविण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर अधिक तपासणीसाठी त्यांना गडचिरोली येथे पाठविण्यात आले.तेथे करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये डोक्यात रक्ताची गाठ(ब्लड क्लॉट)असल्याचे निदर्शनास आले.शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते,असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल्याने कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात हलविले.
सदर व्यक्ती(रहमान भाई)परिसरातील विविध गावांतील साप्ताहिक बाजारांमध्ये कपड्यांचा व्यवसाय करतात.घटनेच्या दिवशी दुपारची नमाज अदा केल्यानंतर ते सावली येथील बाजाराकडे दुचाकीने निघाले होते.खेडी फाट्याजवळ पोहोचताच ही घटना घडली.दरम्यान,या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.काहींच्या मते अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असावा,तर काहींच्या मते तीव्र उष्णता व उकाड्यामुळे त्यांना चक्कर येऊन,ते रस्त्यावर कोसळले असावेत? मात्र,नेमके काय घडले,याबाबत अद्याप स्पष्टता नसून जखमी व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतरच घटनेचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
#Shocking Accident News...
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
