Shivrajyabhishek Din Sohala 2026 : भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक!|Marathi News.

News@Chhatrapati Shivaji Maharaj...

Gadchandur : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे राजे आणि युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आज(दि.६ जून)भारतीय जनता पार्टी गडचांदूर मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.             याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थितांनी शिवरायांच्या शौर्य,पराक्रम,दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी विचारांना वंदन करत राष्ट्रसेवा व समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.         सदर कार्यक्रमाला गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, कोरपना तालुका संघटक महामंत्री सतीश उपलेंचवार,संयोजक तथा शहर महामंत्री सतीश बेतावार,सहसंयोजक गणेश आदे, महामंत्री महेश घरोटे,हरीश घोरे,उपाध्यक्ष अरविंद कोरे,चिटणीस रमेश चुदरी,जयंता भोंगळे,सोमेश्वर सोनकांबळे,नगरसेवक सुरज पांडे,सुरेश मेश्राम,नगरसेविका सौ.कीर्ती वैरागडे,सौ.संगीता गाऊत्रे,कोरपना तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रा.स्मिता चिताडे,युवा मोर्चा अध्यक्ष विवेकानंद (विक्की)उरकुडे,विठ्ठल धांडे,शाकीर भाई,बबलू रासेकर,गणपत बुरटकर,नागेश रोहणे, सचिन चुरे,विकी घोरे,धवल घोरे,नारायण सोननटक्के,            यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १२ वर्षांच्या विविध विकास कामांचा गौरव करत विकसित भारताच्या निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

#Chhatrapati Shivaji Maharaj. #Shivrajyabhishek Din Sohala 2026.

                      $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$