Murder Case : सुपारी देऊन पत्नीने केला पतीचा गेम!|Marathi News.

News@Shocking...

  Chandrapur : जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांना 2 एप्रिल रोजी सकाळी 10,30 च्या दरम्यान फोनद्वारे माहिती मिळाली की, घोडपेठ येथे कर्मवीर शाळेजवळील रोडवर,हनुमान मंदिर शेजारी एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला आहे.या माहितीवरून घटना स्थळी धाव घेत पाहणी केली तेव्हा एक व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला.दरम्यान मृतदेहाची ओळख पटवली असता,त्याचे नाव रविन्द्र तुळशिराम कुळमेथे वयवर्ष 46 रा.मुधोली चेक नं.02 ता.चामोर्शि जि.गडचिरोली,असे समजले. सदर घटने संदर्भात भद्रावती पोलीस स्टेशन येथे अकास्मीक मृत्युची नोंद करून भद्रावती पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB)ने संयुक्तपणे कारवाई करून आरोपी दिपमाला रविन्द्र कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून,सोनु उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारीला नागपूरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता,मृतकाची पत्नी दिपमाला कुळमेथे,हिने आरोपी वर्षा परचाके,सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी,यांना स्वतःच्या पतीचा खून करण्यासाठी 1 लाखाची सुपापारी दिल्याचे निष्पन्न झाले. 

                'आरोपींनी अशाप्रकारे गुन्ह्याची कबूली दिली.'

     पोलिसांनी सदर आरोपींना गुन्ह्याबद्दल विचारपूस केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली की,1 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या दरम्यान मृतकाला कारमध्ये बसवून मौजा घोडपेठला सुनसान जागेत आणले.मृतकाचा कारमध्येच गळा आवळला व तो मरण पावल्यानंतर त्याचा शव तेथेच सोडून कार घेवून निघून गेले. यावरून त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली झेनस्टिलो कार क्र.MH/31/DC/8919,तीन मोबाईल जप्त करून भद्रावती पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली आहे.पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. 

           सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस स्टेशनचे पोनि.योगेश्वर पारधी,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि.निंबोडकर,भद्रवती पोलीस स्टेशनचे सपोनि. विरेन्द्र केदारे,सपोनि.संजय मिश्रा,मपोउपनि.प्रियंका गेडाम,पोस्टे. भद्रावती येथील शोध पथकातील सफौ.महेन्द्र बेसरकर,पोहवा. अनूप आस्टूनकर,जगदीश झाडे,विश्वनाथ चुदरी,धर्मराज मुंडे, पोअं.योगेश घाटोळे,संतोष राठोड,प्रेमकुमार बावनकर,रोहित चिटगिरे,मपोअं.करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेका.नितीन कुरेकार,नितीन साळवे,प्रमोद कोटनाके,किशोर वैरागडे,पोअं.अमोल सावे,गोपी नरोटे,शेखर मातनकर,दिनेश अराडे,रूषभ वरकिंगे यांनी केली.

#Chandrapur District Crime News.#Murder Case.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$