Crime : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून, तिला ठार मारल्याची संतापजनक घटना 1 मे रोजी घडली होती. या घटने नंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते.लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमला तात्काळ फाशी द्यावी,या मागणीसाठी पुण्यातील नवले पूलावर नसरापूरच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याची ग्वाही दिली.अशातच आता पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.या अहवालातील माहिती अंगावर अक्षरश: काटा आणणारी आहे.
'बघा शवविच्छेदन अहवाल.'
पिडीतेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबण्यात आला होता!लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर वळ उमटल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनात आल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे या चिमुरडीची किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली! हे समजून येत आहे.ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे.हा अहवाल समोर आल्यानंतर आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
ही मुलगी आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती.उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या आजोळी नसरापूरला आली होती.ती खेळत असताना आरोपीने तिला 'गोठ्यात वासरु दाखवायला नेतो' सांगून आपल्यासोबत नेले आणि तिच्यावर अत्याचार केले होते.या प्रकरणातील आरोपी नराधमावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल असल्याचे कळते.अगोदर या प्रकरणावरून राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.दरम्यान,पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय चाचणी देखील केली आहे.सध्या पोलीस सर्व पुराव्यांची जुळवाजुळव करत असून लवकरच आरोपपत्र दाखल होऊन,या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू होईल.
#Nasrapur Rape Case News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
