Gadchandur : पोलीस स्टेशन हद्दीत 5 मे 2026 मंगळवार रोजी सकाळी अंदाजे 10 च्या दरम्यान स्थानिक माणिकगड सिमेंट कंपनी रोडवरील 'हॉटेल रामकृष्ण' समोर एका बंद ट्रकच्या खाली अंदाजे 30,35 वर्षीय एक अनोळखी तरूण पोलिसांना मृत अवस्थेत आढळून आला.संशयस्पद कुठलीही वस्तू मिळाली नाही व घातपाताचा संशय नाही.पोलिसांकडून सदर तरूणाची ओळख पटवणे सुरू असून माहिती (शोध)घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करणे सुरू आहे.सदर मृतकाच्या डाव्या हातवर इंग्रजीमध्ये अस्पष्ट vinod,असे गोंदलेले आहे.उंची 5.5 ते 5.6 फूट,रंग सावळा.बांधा सडपातळ,डोक्यावर काळे छोटे केस, हलकी दाढी-मिशा.' अंगातील कपडे.' कमरेमध्ये कथिया रंगाची लक्सकॊजीची अंडरवेअर व हिरव्या रंगाचा नाड्याचा लोवर पॅन्ट,फुल बाही हिरव्या रंगाचा शर्ट व आतमध्ये मळकट पांढरी सॅंडो बनियान.
'नागरिकांना आवाहन.'
सदर मृतक हा कामगार वर्गातील दिसत असून कोणी ओळखत असेल तर सपोनि.स्वप्नील तायडे मो.नं.8793366975,
PSIपंकज हेकाड मो.नं.8830798136,
PC मनोहर जाधव मो.नं.9767976652,
यांना तात्काळ कळवण्याचे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी केले आहे.
#Unknown corpse.#The body of an unidentified young man was found in Gadchandur City.
$$$$$$$$$$$$$$$$$$
