Problem of Stray Animals : गडचांदूर शहरात मोकाट जनावरांचा हैदोस शिगेला!|Marathi News.

News@Stray Animals...

Gadchandur : शहरात हल्ली मोकाट जनावरांनी अक्षरशः हैदोस घातला आहे.लहान मुले,वृद्धांना अचानकपणे धडक देणे,शिंग मारणे,असे विविध प्रकार नित्याचेच झाले आहे.जनावरांच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जीव टांगणीला लागला आहेत.शहरात मोकाट जनावरांची समस्या डोक्याला ताप बनली असताना नुकतेच प्रभाग क्रमांक 7,मधील एका 5 ते 6 वर्षांच्या चिमुरड्याला परिसरातील मोकाट जनावरांनी जखमी केले आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नगरपरिषदेने तात्काळ एक विशेष मोहिम राबवून शहरातील समस्त मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकावे,आणि या जनावरांच्या मालकांवर थेट फौजदारी कारवाई करावी,अशी मागणी प्रभाग क्रमांक 7,च्या विरोधी पक्ष नगरसेविका सौ.किर्ती वैरागडे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी,नगराध्यक्षाकडे निवेदनातून केली आहे.या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा, माझ्या प्रभागात एखाद्याची जीवित हानी झाली तर याला मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख जबाबदार राहतील,असा इशारा नगरसेविका सौ.किर्ती वैरागडे यांनी दिला आहे.आता नगरपरिषद याला किती महत्त्व देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

                        'भाजपा शहराध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया.'

तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर,येथे मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यापुर्वी आमच्या भाजपच्या नगरसेविका सौ.किर्ती वैरागडे यांनी अनेकदा नगर परिषदेला माहिती दिली.परंतू याकडे दुर्लक्ष केले जात आहेत.गडचांदूर नगर परिषदेत भाजप विरोधी बाकांवर असल्याने,यांच्या मागण्यांकडे नगराध्यक्ष, सत्ताधारी व नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मात्र,मी त्यांना सांगू इच्छितो या किर्ती वैरागडे यांच्या प्रभागातील 5 ते 6 वयाच्या शेख रिज़वान,या मुलाला एका मोकाट जनावराने जखमी केले,ही घटना योग्य नाही.सत्ताधारी जर विरोधी नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असेल तर ही बाब आम्ही कदापि खपवून घेणार नाही.असे असेल तर भविष्यात मोठे आंदोलन उभे करू.आमचे विरोधी नगरसेवक कुठल्याही प्रकारची योग्य मागणी करत असेल तर विचारात घ्यायला पाहिजे. असे संतप्त मत गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.

#Gadchandur Nagarparishad. #The problem of stray animals. #Marathi News.

                    $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$