Operation search : ऑपरेशन शोध-4 ला मोठे यश; 5 वर्षांपासून बेपत्ता बालिका व आरोपीचा वर्ध्यातून शोध!|Marathi News..

News@Crime...

           Chandrapur : जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन शोध-4 मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा(LCB),मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि सायबर सेल,चंद्रपूर यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा तसेच संबंधित आरोपीचा यशस्वी शोध लावला आहे.

पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र.1064/2022 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 363 व 370 अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.तपासात संबंधित मोबाईल क्रमांक समुद्रपूर(जि.वर्धा)परिसरात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर प्राप्त कॉल डिटेल रेकॉर्ड(CDR)आणि इतर तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले.या विश्लेषणातून पीडित बालिका आणि संशयित लक्ष्मण कवडू श्रीरामे (वय 30, रा.चिंचोली,ता.भद्रावती,जि.चंद्रपूर)हे वर्धा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे AHTU/LCB पथकाने तातडीने कारवाई करत दि.19 जून 2026 रोजी समुद्रपूर,जि.वर्धा येथून दोघांनाही ताब्यात घेतले.त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही व तपासासाठी त्यांना पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा उलगडा होऊन तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.पोलीसांच्या समन्वित प्रयत्नांमुळे आणि तांत्रिक तपासाच्या प्रभावी वापरामुळे ही कारवाई यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले.

कारवाईत सहभागी पथक :

मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU),चंद्रपूर

स्थानिक गुन्हे शाखा (LCB),चंद्रपूर

सायबर सेल,चंद्रपूर

ही कारवाई जिल्हा पोलीस दलासाठी एक महत्त्वपूर्ण यश मानली जात असून,बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन शोध-4 मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

#Chandrapur District Crime News.#Operation search.

                             $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$