Missing Girl Case : गडचांदूरमध्ये खळबळजनक घटना! १२ वर्षीय मुलगी बेपत्ता; पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे!|Marathi News.

News@Crime...

   Gadchandur : पोलीस स्टेशन हद्दीतील १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून,या प्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहिता (BNS)अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित मुलगी ही परिसरातील एका आश्रमशाळेत शिक्षण घेत असून,शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने ती गेल्या २ महिन्यांपासून आपल्या घरी राहत होती. सोमवार,१५ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान ती मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली.मात्र रात्री उशिरापर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.मुलीच्या आईने नातेवाईक,मित्रपरिवार तसेच गावातील विविध ठिकाणी शोध घेतला.दुसऱ्या दिवशीही दिवसभर शोधमोहीम सुरू ठेवूनही मुलीचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.अखेर १६ जून रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

   तक्रारीमध्ये आपल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार गडचांदूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता,२०२३ च्या कलम १३७(२)अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय करण्यात आले आहे.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

महत्त्वाचे;

अल्पवयीन मुलीबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ गडचांदूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

#Chandrapir District Crime News.#Gadchandur Missing Girl.

                                $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$