Chandrapur : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा (LCB)ने भद्रावती परिसरात धडक कारवाई करत तब्बल 168.94 ग्रॅम एमडी(मेफेड्रोन)ड्रग्ज जप्त केले.या कारवाईत नागपूर येथील एका संशयित तस्कराला अटक करण्यात आली आहे.त्याच्या कडून ड्रग्ससह तस्करीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करून एकूण ₹ 14 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंदे व अंमली पदार्थ तस्करीविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेदरम्यान LCB च्या पथकाला 2 जुन रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की,नागपूर येथील अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार वयवर्ष 40,हा मोठ्या प्रमाणात MD ड्रग्स घेऊन भद्रावतीकडे येणार आहे.
माहितीच्या आधारे LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने कारवाईची योजना आखली.आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागपूर-भद्रावती मार्गावरील जमघट हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला.3 जून रोजी पहाटे 12.35 च्या सुमारास संशयित पांढऱ्या रंगाची होंडा अमेझ कारने घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन ताब्यात घेतले.चालकाची चौकशी केली असता,त्याने आपली ओळख अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार रा. तुकडोजी चौक नागपूर,अशी सांगितली.यानंतर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपी व वाहनाची झडती घेण्यात घेतली.झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून 168.94 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन)ड्रग्स पावडर,कि.अं.₹8.50 लाख तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कार,असा एकूण किअं.₹14 लाख,11हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात संबंधीत कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनील गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,सतीश अवथरे,रजनिकांत पुट्ठावार,दीपक डोंगरे,इमान खान,पोअं. हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.चंद्रपूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई मानली जात असून,जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ड्रग्स नेटवर्कला यामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
#Chandrapur District Crime News.#MD Durgs big bag seized! Nagpur smuggler arrested by Chandrapur LCB; 14 lakh worth of goods seized.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
