LCB action against illegal sand transportation : अवैधरित्या रेती वाहतुकीवर LCB ची धडक कारवाई!| Marathi News.

News@Crime...

  Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरच्या पथकाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. 17 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की,रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा थेरगाव (ता.पोंभूर्णा) येथील नदीपात्रातून अवैधरित्या गौण खनिज (रेती) उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे.प्राप्त माहितीच्या आधारे LCB पथकाने छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान ईश्वर सोहनलाल बैरिया (वय 30 रा. संजयनगर,चंद्रपूर)यास ताब्यात घेण्यात आले.आरोपीकडून अवैध रेतीसह एक हायवा ट्रक जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमाल :

अशोक लेलँड हायवा ट्रक (क्र. MH-49-BZ-5157) – किंमत अंदाजे ₹ 40,00,000

04 ब्रास रेती – किंमत अंदाजे ₹28,000

एकूण जप्त मालाची किंमत : ₹40,28,000

या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आला असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाई करणारे पथक :

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी गणेश भोयर,किशोर वैरागडे,अजय बागेसर,गोपीनाथ नरोटे आणि शेखर माथनकर यांनी संयुक्तपणे पार पाडली.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम सुरू असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

#Chandrspur District Crime News.#LCB action against illegal sand transportation.

          ‌          $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$