Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेच्या(LCB)पथकाने सिंदेवाही येथे धाड टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.Illegal gutkha,tobacco case Sindewahi.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की,सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील काही छुप्या खोल्यांमध्ये विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशा सामग्रीचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला आहे.या माहितीच्या आधारे LCB पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.Crime news.
कारवाईदरम्यान मुख्य आरोपी सागर प्रमोदराव केकरे (वय 34,रा. आझाद चौक,सिंदेवाही),याला ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर घटनास्थळाची झडती घेतली असता सुगंधित तंबाखू व हुक्का शिशा तंबाखूचा सुमारे 2 लाख 84 हजार 845 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील कारवाईसाठी आरोपीला सिंदेवाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कलम 30(2)(a),26(2)(i),26(2)(iv), 59 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123,223, 275 व 3(5)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील पुरवठादार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दीपक काँक्रेटवार,पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोहवा.गणेश मोहुर्ले,गणेश भोयर, चेतन गज्जलवार,संतोष पेलपुलवार,जयसिंग,सचिन गुरनुले, पोअं.सुमित बरडे व अजित शेंडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
#Illegal gutkha,tobacco case Sindewahi.#Acction by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
