Tukaram Mundhe Action : रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्याची कोणतीही कायदेशीर सक्ती नसल्याचे FDAआयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.औषधे कुठून घ्यायची हा निर्णय पूर्णपणे रुग्णांचा अधिकार असून याबाबत स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील लाखो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना औषधे किंवा वैद्यकीय साहित्य केवळ हॉस्पिटलमधील अधिकृत फार्मसीमधूनच खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही,असे स्पष्ट करत अन्न,औषध प्रशासन (FDA) विभागाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.FDAआयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा हा निर्णय जाहीर करत रुग्णालयांना कडक इशाराही दिला आहे.
'औषधे कुठून घ्यायची,हा रुग्णाचा अधिकार.'
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक असलेली औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्या अंतर्गत फार्मसीमधूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते.मात्र,अशी सक्ती कोणत्याही कायद्यात मान्य नाही.
“रुग्णाला औषधे कुठून खरेदी करायची हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे.रुग्णालय प्रशासन किंवा कोणतीही संस्था त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही.बाहेरील नोंदणीकृत मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करणे हा रुग्णांचा वैयक्तिक आणि कायदेशीर अधिकार आहे,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
#Tukaram Mundhe Action news.#Hospital Medicine Rules
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
