Crime News : मुल येथे बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीवर मोठी कारवाई;९.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त!||Marathi News.

News@Crime...

              Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB),चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदारांना १६ जून २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुल शहरात मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार,एका व्यक्तीकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला असून त्याच्या राहत्या घरी बनावट सुगंधित तंबाखूची निर्मिती केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन मुल यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.या कारवाई दरम्यान आरोपी मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ(वय २७ वर्षे)रा. वॉर्ड क्र.१७,ताडाळा रोड,मुल,ता.मुल,जि.चंद्रपूर याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य,मशिनरी,महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू व पानमसाल्याचा मोठा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार क्रमांक MH-27 BV-2907 जप्त करण्यात आली.या कारवाईत एकूण ९ लाख ८५ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीसह जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन,चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आला.अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता(BNS)तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम,२००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशन मुल करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO)सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात पोउपनि.संतोष निंभोरकर,विनोद भूरले,रूपेश कुंभरे,पोअं. धनराज करकाडे,जयंत चुनारकर,चेतन गज्जलवार,सुरेंद्र महंतो, सुमित बरडे,प्रफुल्ल गारघाटे,किशोर वाकाटे,दिपीका सोडणार तसेच सायबर पोलीस स्टेशन,चंद्रपूरच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.

#Crime News. #Chandrapur District Crime.

                               $$$$$$$$$$$$$$$$$$$$$