Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB)चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती शहरातील गुरूनगर परिसरात धडक कारवाई करत एका युवकाला ६५० ग्रॅम गांजासह अटक केली.या कारवाईत गांजा व मोबाईल फोन असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,आरोपीचा एक साथीदार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूनगर येथे छापा टाकून गुरूदास उर्फ चेतन भास्कर पोइनकर (वय २३,रा.गुरूनगर,भद्रावती)याच्या घराची झडती घेतली.यावेळी त्याच्या ताब्यातून ६५० ग्रॅम गांजा(अंदाजे किंमत ६ हजार रुपये) तसेच एक मोबाईल फोन(अंदाजे किंमत १० हजार रुपये) जप्त करण्यात आला.या प्रकरणातील दुसरा संशयित इशांत मानकर (रा.भद्रावती)हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप.क्र.६५०/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कलम ८(क),२०(ब)(ii)(a), २९ एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#Crime News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
