Crime News : दोन भरमार बंदुकांसह एकाला अटक; LCB व मुल पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!| Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) व मुल पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन भरमार बंदुकांसह एका युवकाला अटक केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विविध अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने ३ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी मुल शहरात गस्त घालत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली की,संजु सिंग संतोष सिंग पटवा (वय २४,रा.वॉर्ड क्र.१७, ताडाळा रोड,मुल),याने आपल्या राहत्या घरी विनापरवाना भरमार बंदुका लपवून ठेवल्या आहेत.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व मुल पोलीस स्टेशनच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून गावठी बनावटीच्या दोन भरमार बंदुका जप्त करण्यात आल्या.जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.शस्त्रे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम,१९५९ च्या कलम ३ व २५ अन्वये मुल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO)सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.कारवाईत मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, विनोद भूरले,रूपेश कुंभरे तसेच पोलीस अंमलदार धनराज करकाडे,चेतन गज्जलवार,सुरेंद्र महतो,सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे,मिलिंद टेकाम,नरेश कोडापे,संदीप चुदरी आणि पूजा मेश्राम यांनी सहभाग घेतला.

#Chandrapur District Crime News.

                        $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$