Crime News : डुप्लिकेट तंबाखूची निर्मिती व विक्री; एकाला अटक,11 लाख 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त!|Marathi News.

News@Illegal Flavored Tobacco..

   Chandrapur : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून,मशीनच्या सहाय्याने बनावट (डुप्लिकेट)तंबाखूची निर्मिती व विक्री करणाऱ्या एका केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूर,सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने 11 जून रोजी संयुक्तपणे छापा टाकून एकूण 11 लाख 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली आहे.

                                    'अशी झाली कारवाई.' 

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर,यांना गोपनीय माहिती मिळाली होती की,मौजा रयतवारी ता.सावली,येथे विजय भिमाजी भांडेकर वयवर्ष 33 रा.सामदा बु.ता.सावली,हा बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा बाळगून आहे.तसेच तो मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करून त्याची बाजारात विक्री करत आहे.या माहितीच्या आधारे LCB,सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने रयतवारी येथील संशयास्पद ठिकाणावर छापा टाकला.

                              'जप्त करण्यात आलेला मुद्देमाल' 

HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू,खुला सुगंधित तंबाखू,तंबाखू पॅकिंगसाठी लागणारे साहित्य,उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री(मशीन)वाहन क्रमांक MH/34/CJ/9625,एकूण जप्त माल अं.कि.11 लाख 31 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता,त्याने हा सर्व कच्चा माल आणि साहित्य विनय गुप्ता रा.गोकुळ नगर गडचिरोली,याच्या कडून खरेदी केल्याची कबुली दिली.जप्त साहित्यावरून आरोपी हा मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूचे पॅकिंग आणि बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.यावरुन प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन,साठवणूक,वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहिता(BNS)अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सावली पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार तसेच अन्न व अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी,यांच्या नेतृत्वात LCB चे सपोनि.दीपक काँक्रेटवार,सपोनि.बलराम झाडोकर,पोउपनि. विनोद भूरले,पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.सर्वेश बेलसरे, सफौ.धनराज करकडे,पोहवा.गणेश भोयर,पोहवा.चेतन गज्जलवार,पोहवा.संतोष येलपुलवार,पोहवा.जयसिंग,चापोहवा. दिनेश आराडे,पोअं.सुमित बर्डे,पोअं.प्रफुल गारघाटे,चापोअं. मिलिंद टेकाम,ऋषभ बारसिंगे तसेच अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.#Illegal Flavored Tobacco Case.

                             $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$