Chandrapur LCB Raid : जुगार अड्ड्यावर LCB ची धाड; 10 जुगारी ताब्यात!|Marathi News.

News@Crime.. 

         Chandrapur : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB)ने शहरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

    मिळालेल्या माहितीनुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व अवैध जुगार-मटका व्यवसायाबाबत माहिती संकलित करीत असताना गुप्त माहिती प्राप्त झाली की,आंबेडकर चौक,बाबुपेठ वॉर्ड,येथील रहिवासी गुणवंत सोमाजी आवळे (वय 35)हा आपल्या राहत्या घरी काही इसमांना एकत्र करून पैशांची बाजी लावत ‘तीन पत्ती’ जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

            माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या परवानगीने LCB च्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.या कारवाईत एकूण 10 जणांना ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुणवंत सोमाजी आवळे (35),रॉयल शैलेंद्र पाटीला (27),सचिन प्रल्हाद गोवर्धन (35),अतुल धनराज ढोक (36), शामराव प्रल्हाद पिपरे (52),सचिन मिलिंद मानकर (40),प्रफुल ज्ञानबा भागवत (36),सुधीर हिरालाल जांभुळकर (34),ब्रम्हदेव मोहन गोरी (54)आणि अविनाश संजय वासेकर (30)यांचा समावेश आहे.या सर्व आरोपींविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार,पोलीस हवालदार सुभाष गोहकार,सतिश अवथरे,रजनिकांत पुट्ठेवार,दीपक डोंगरे,इमरान खान तसेच पोलीस अंमलदार हिरालाल गुप्ता,किशोर वाकाटे, शशांक बदामवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली आहे.

#Chandrapur Crime Riport.#LCB Raid.

                 $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$