Chandrapur : जिल्ह्यातील बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB)ने केलेल्या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 39 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,4 जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने बल्लारपूर परिसरात छापा टाकला.या कारवाईदरम्यान सलमान खान मजीद खान पठाण (वय 28,रा.दादाभाई नौरोजी वॉर्ड,बल्लारपूर)याच्या ताब्यातून विनापरवाना बाळगण्यात आलेले एक गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र)आणि 4 राऊंड जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात राजुरा उपविभाग व चंद्रपूर LCB पथकाने संयुक्तरीत्या केली आहे.
#Chandrapur District Crime News Apdate.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
