Chandrapur Crime : कोरपना येथील सराईत वाहनचोराच्या LCB ने आवळल्या मुसक्या!|Marathi News.

News@Crime...

      Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चंद्रपूरच्या पथकाने सराईत वाहनचोराचा शोध घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेल्या तब्बल ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

दि.२० जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोरपना परिसरात सापळा रचून महेश उर्फ मेंढी सुरेश पटकूटवार (वय २८) रा.साईबाबा वॉर्ड,कोरपना,जि.चंद्रपूर,याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबूली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

उघडकीस आलेले गुन्हे :

१) पोलीस स्टेशन राजुरा – अप.क्र.508/2026,कलम 303(2) BNS (हिरो स्प्लेंडर).

२) पोलीस स्टेशन राजुरा – अप.क्र.459/2025,कलम 303(2) BNS (स्प्लेंडर प्रो).

३) पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर – अप.क्र.749/2025,कलम 303(2)BNS (पॅशन प्रो).

४) पोलीस स्टेशन पडोली – अप.क्र. 146/2026,कलम 303(2)BNS(हिरो स्प्लेंडर प्लस).

५) पोलीस स्टेशन रामनगर – अप. क्र.275/2025,कलम 303(2)BNS(स्प्लेंडर प्रो),

६) पोलीस स्टेशन मुकुटबन जि.यवतमाळ – अप.क्र.172/2025, कलम 303(2)BNS(स्प्लेंडर प्लस)

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई :

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवर,बलराम झाडोकर,सहाय्यक फौजदार स्वामीदास चालेकर,पोलीस हवालदार अजय बागेसर,किशोर वैरागडे,गणेश भोयर,जयंता चुनारकर,पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे,शेखर माथनकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून,स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षम तपासाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

#Chandrapur District Crime News.#Action by LCB Chandrapur.

                               $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$