Appreciable : ऑपरेशन शोध-4 अंतर्गत मोठे यश; वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा शोध!|Marathi News.

News@Chandrapur Police..

Chandrapur : जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन शोध-4 मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (LCB)मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU)आणि सायबर सेलच्या संयुक्त पथकाने वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा तसेच तिला पळवून नेल्याच्या प्रकरणातील आरोपीचा यशस्वी शोध लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन चिमूर येथे अप.क्र.41/ 2025 अंतर्गत कलम 137(2) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.तपासातून संबंधित मोबाईल क्रमांक मौजा गुंमथळा,ता. कामठी,जि.नागपूर परिसरात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर प्राप्त सीडीआर (Call Detail Record) तसेच इतर तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले.या विश्लेषणातून पीडित अल्पवयीन मुलगी आणि संशयित सरगम केशव बावणे (वय 25),रा.मोटेगाव,ता.चिमूर हे नागपूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पथकाला मिळाली.

प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत 15 जून रोजी नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले.त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही आणि तपासासाठी त्यांना चिमूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला असून, ऑपरेशन शोध-4 अंतर्गत चंद्रपूर पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.सदर कारवाई AHTU, LCB आणि सायबर सेल,चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने केली.

#Appreciable. #Chandrapur District Crime News.

                          $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$