Very Important meeting : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्वाची बैठक संपन्न!|Marathi News.

News@Important meeting.

   Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील 'मंथन हॉल' येथे 21 मे रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सदर बैठकीत जिल्हा महिला दक्षता समिती आणि ज्येष्ठ नागरिक समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे,त्यांना तातडीने आवश्यक ती मदत मिळवून देणे,हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.बैठकीदरम्यान अत्यंत सकारात्मक वातावरणात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.                                    'महिलांची सुरक्षा आणि समुपदेशन.'

     जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करणे, सार्वजनीक ठिकाणी महिलांची सुरक्षा वाढवणे,पीडित महिलांना कायदेशीर व मानसिक आधार देण्यासाठी दक्षता समितीने अधिक सक्रियपणे काम करण्याबाबत चर्चा झाली.

                     'ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि संरक्षण.'

     एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक,त्यांच्या सुरक्षेच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणींवर बैठकीत मंथन करण्यात आले.ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाकडून तात्काळ मदत मिळावी,यासाठी आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

                                      'समन्वय आणि संवाद.'

     पोलीस प्रशासन,महिला दक्षता समिती आणि ज्येष्ठ नागरिक समिती यांच्यात उत्तम समन्वय कसा राखता येईल,जेणेकरून समाजातील या घटकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, यावर विस्तृत रणनीती आखण्यात आली.

                                               'आवाहन.'

      महिला आणि ज्येष्ठ नागरिक,हे आपल्या समाजातील अत्यंत संवेदनशील घटक आहेत.त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून संपूर्ण समाजाची आहे.जिल्हा पोलीस प्रशासन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सदैव तत्पर आहे.समितीच्या सदस्यांनी नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून एक मजबूत कवच तयार करावे.बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,सपोनि.प्रज्ञा वाडेकर भरोसा सेल,चंदपूर पोउपनि. रविंद्र चेरकुलवार वाहतुक शाखा चंद्रपूर,श्रीमती पुनम आसेगांवकर समाज कल्याण निरीक्षक सामाजिक न्याय विभाग चंद्रपूर,डॉ.प्रियंका पेन्दोर सामान्य रुग्णालय चंद्रपूर,डॉ.श्रीमती नसरीन मावाणी,ॲड.श्रीमती आम्रपाली लोखंडे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर,ॲड.श्रीमती प्रिती खातखेडे जिल्हा महिला बाल विकास कार्यालय चंद्रपूर,श्रीमती भावना रंगारी समुपदेशीका भरोसा सेल,श्रीमती उज्जवला पोईनकर समुपदेशीका भरोसा सेल,डॉ.श्रीमती अल्का ठाकरे मुख्याध्यापिका जि.प.शाळा देवाळा,श्रीमती पुष्पा उराडे नगरसेविका तुकूम चंद्रपूर,श्रीमती चंदाताई वैरागडे नगरसेविका तसेच श्री श्रीराम तोडासे,सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक तथा ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम राऊत,सचिव चैतन्य ज्येष्ठ नागरिक मंडळ तुकूम चंद्रपूर,रमेश नामेदवराव कासुलकर,वरदविनायक शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर,रमेश ददगाल ज्येष्ठ नागरिक संघ तुकूम,गोसाई श्रावण बल्की उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.#Very important meeting in SP Office Chandrapur.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$