Gadchandur : नगरपरिषदेचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक अधिकारी 'येमाजी धुमाळ', यांनी कोणताही ठराव न घेता मार्च 2025 च्या दरम्यान पुर्णपणे बोगस व ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवून नगरपरिषद निधीचा अपहार केल्याचा आरोप गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.सोबतच सदर प्रकरण गंभीर असून याविषयी नगरपरिषदेने विशेष सभा आयोजित करून मुख्याधिकारी धुमाळ विरोधात पोलीस कम्प्लेंट (FIR)दर्ज करावी अशी मागणी डोहे यांनी केली आहे.याप्रकरणी पुराव्यांसह एकुणएक कागदपत्रे नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना टपालद्वारे पाठवण्यात आले आहे.घनकचरा व्यवस्थापनासाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर घेण्याच्या नावाखाली कोणताही ठराव न घेता पुर्णपणे बोगस व ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवून नगर परिषदेचा 90 हजारांचा अपहार केल्याची बाब एक सुज्ज्ञ नागरिक म्हणून माजी नगरसेवक डोहे,यांनी नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिली असून कारवाई न केल्यास आपण कर्त्यव्यास कसूर करीत असल्याचे ग्राह्य धरून एक सुजाण नागरिक म्हणून मला आपल्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल,असा थेट इशारा डोहे यांनी पत्राद्वारे केली आहे.
'नेमकं प्रकरण काय?
डोहे यांनी दिलेल्या निवेदनानुसार,नगरपरिषदेचा घनकचरा टाकण्यासाठी शेत जमीन भाडे तत्वावर घेण्याबाबतचा ठराव घेण्यात आलेला नाही.त्यामुळे काढलेली निविदा ही नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.निविदा प्रपत्रावर जावक क्रमांक नसताना ती निविदा,निविदा समितीने पात्र ठरविले.हे नियमबाह्य,बेकायदेशीर आहे.निविदाधारकाची निविदा प्रपत्रावर सही नसताना निविदा, निविदा समितीने पात्र ठरविले.हे नियमबाह्य,बेकायदेशीर आहे. निविदा धारकांने निविदासोबत पॅन कार्ड,ओळखपत्र,आधारकार्ड जोडलेले नसतांना,ती निविदा पात्र ठरविले.हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.निविदा सोबत जोडलेला 7/12,हा मोबाईल ऍपवरून काढलेला जोडला आहे.त्याला कायदेशीर मान्यता नसताना निविदा समितीने पात्र ठरविले.हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.
'सदर निविदेत आलेले एकूण 3 बिट.'
तुळशीराम भीमा सिडाम,तुळशीराम बुच्च्या महाडोळे,राजेश माधव मोहुर्ले.या तिघांच्या निविदेतील कागदपत्रे अपूरे,बोगस असताना,निविदा समितीने निविदा पात्र ठरविले.हे पूर्णपणे चुकीचे असून नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.चुकीच्या निविदा पात्र ठरवून निविदा समितीने तुलनात्मक तक्ता तयार करून, स्थायी समितीत सादर केला.हे पूर्णपणे चुकीचे,नियमबाह्य आहे. 17 मार्च 2025 रोजी स्थायी समितीची सभा घेण्यात आली व त्यामध्ये सर्वात कमी दर तुळशीराम सिडाम,यांच्या नावे दाखवून सभेत मंजुरी दिली.हे चुकीचे असून नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.नगरपरिषदेकडून जावक क्र.नपग/स्वास्थ वि./391/1,दि. 17 मार्च 2025 नुसार,तुळशीराम सिडाम यांना कार्यादेश दिला.हा कार्यादेश नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.नगरपरिषदेकडून जावक क्र.नपग/स्वास्थ वि./391,दि.17 मार्च 2025 नुसार तुळशीराम सिडाम यांना स्विकृत पत्र दिले.हे सुद्दा नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.तुळशीराम सिडामकडून करारनामा दर निश्चित होण्यापूर्वीच दि.15 मार्च 2025 ला करारनामा करण्यात आला.हे पूर्णपणे चुकीचे व नियमबाह्य,बेकायदेशीर आहे.जागा मालकाची संमती नसताना भाडे रक्कमेचा पहिला धनादेश मुळमालकाच्या नावे न देता,अनिल सिडाम यांना (HDFC बँक धनादेश क्र.00000 0000243 रुपये 45 हजार)दि.17 मार्च 2025 ला देण्यात आला. ते नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. भाडे रक्कमेचा दुसरा धनादेश मूळ मालक तुळशीराम सिडामच्या नावे (HDFC बँक गडचांदूर, धनादेश क्र.00000000629,रुपये 45 हजार)दि.29 सप्टेंबर 2025 ला,असे एकूण 90 हजार रुपये देवून मुख्याधिकारी, निविदा समिती सदस्य व शेतमालकांनी संगनमत करून न.प. निधीचा अपहार केलेला आहे.हे पूर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहे.संबंधित शेत मालक तुळशीराम सिडामकडून शंभर रूपयेच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून,तो अनिल सिडामच्या नावाने वापरला,हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.दर निश्चित होण्या आधीच करारनामा दि.15 मार्च 2025 रोजी करण्यात आला.हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.
सदरचे कृत्य तत्कालीन मुख्याधिकारी,शेत मालक आणि तत्कालीन निविदा समितीने संगनमताने केले असून,ते भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(5),336(3),338,340(2)व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7,13(1)(a),13 (2)अन्वये दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे.जनतेने विश्वास टाकून नगरपरिषदेच्या प्रमुख पदावर आपली निवड केली.यामुळे नगर परिषदेच्या निधी व मालमत्तेची देखभाल करणे,जतन करणे आपले आध्यकर्त्यव्य असल्याने तातडीची विशेष सभेद्वारे ठराव मंजूर करून तत्कालीन मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांच्यावर बोगस निविदा व निधी अपहार प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणी माजी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली.अन्यथा मला आपल्या विरोधातच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल,असा इशारा डोहे यांनी पत्राद्वारे दिला आहे.आता न.प.चे सत्ताधारी डोहे यांच्या पत्रावर काय भूमिका घेतात,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सदर प्रकरणी मुख्याधिकारी धुमाळ यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण संपर्क झालेला नाही.
#Misappropriation of Municipal Council Funds.#Gadchandur Nagarparishad.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
