N.P.Gadchandur : गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकाऱ्यावर शासकीय निधी अपहाराचे गंभीर आरोप!| Marathi News.

News@N.P.Gadchandur....

            Gadchandur : महाराष्ट्रातील विविध नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी (Chief Officers) वर गंभीर आरोप आणि कारवाईच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.यात लाचखोरी,गैरव्यवहार,आणि अरेरावीसारखे गंभीर विषय आहेत.याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत एक गंभीर प्रकार समोर आला आहे.माजी नगरसेवक तथा गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे खळबळजनक आरोप केले आहे.पोकलेन मशीन भाड्याने घेण्याच्या निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे,खोटे प्रतिज्ञापत्रांद्वारे संगनमत करून 8 लाख, 75 हजार,397 रुपयांचा अपहार केल्याचे डोहे यांनी म्हटले आहे. सदर प्रकरणी येत्या 15 दिवसात मुख्याधिकारी चौहान यांच्यासह ठेकेदार व संबंधितांविरुद्ध भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली फौजदारी व प्रशासकीय कारवाईची मागणी डोहे यांनी संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे.येत्या 15 दिवसांत कारवाई न झाल्यास,उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ नागपूर,येथे जनहीत याचिका दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे डोहे यांनी संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मंत्रालय मुंबई,विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर,यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी नगरसेवक सुरज पांडे, जयंता भोंगळे,अरविंद कोरे इतरांची उपस्थिती होती.

         डोहे यांनी दिलेल्या निवेदनानुसार,मी एक जागरूक नागरिक म्हणून शपथेवर कथन करतो की,गडचांदूर नगरपरिषदेतील मुख्याधिकारी(CO)आशिष चौहान,यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून 3 बोगस निविदाधारकांशी संगनमताने खालीलप्रमाणे गंभीर स्वरूपाचा आर्थिक अपहार केला आहे.

                                      'गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम.'

दि.13/5/2025 ते 3/6/2025 : न.प.गडचांदूरच्या मालकीची स.नं.212/1क्षेत्र 1 हे.आर.जागा समतल करण्यासाठी पोकलेन मशीन भाड्याने घेण्याबाबत ऑफलाईन निविदा मागवण्यात आल्या.

                                             'प्राप्त निविदा.'

1)अर्बन विंज वेस्ट मॅनेजमेंट सोल्युशन प्रा.लि.बल्लारपूर.2)युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था चंद्रपूर.3)नीट अँड क्लीन सर्व्हिसेस.

                                        ‌     'खरेदी दिनांक'

तिन्ही स्टॅम्प ट्रेझरी दि.1/8/2024.

                                            'नोटरी क्रमांक सलग.'

ॲड.तृप्ती मांडवगडे,यांच्याकडून नोंद क्र.1717,1718,1719,दि. 3/8/2024 रोजी नोटरी.

            ‌                                  'तारीख,घोटाळा.'

निविदा दि.13/5/2025 रोजी निघाली,परंतु प्रतिज्ञापत्रे दि. 3/8/2024 ची आहेत.म्हणजे निविदा निघण्याच्या 9 महिने आधीच कागदपत्रे तयार ठेवली होती.

                                               'सह्या नाहीत.'

तिन्ही प्रतिज्ञापत्रांवर निविदाधारक व साक्षीदारांच्या सह्या नाही. तरीही निविदा समितीने निविदा पात्र ठरविल्या.

यावरून हे सिद्ध होते की,मुख्याधिकारी चौहान,यांनी एकाच टोळीच्या 3 बोगस निविदा मागवून,ठराव व कार्यादेश घाईघाईने काढून,खोटे तास दाखवून शासकीय निधीचा अपहार करण्याचा गुन्हेगारी कट रचला आहे.

                                     ‌‌    'झालेले कायद्याचे उल्लंघन.'

1)भारतीय दंड विधान कलम 409,420,467,468,471,120 (ब)-विश्वासभंग,फसवणूक,खोटी कागदपत्रे बनवणे व कट रचणे.

2)भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7,13(1)(ड),13(2)-लोकसेवकाने पदाचा गैरवापर करून स्वतः व इतरास अवैध लाभ मिळवून देणे.

3)महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 कलमान्वये कर्तव्यात कसूर व गैरवर्तन.

                                   'निवेदनाद्वारे कारवाईची विनंती.'

1)लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याधिकारी आशिष चौहान,मे.अर्बन विंज वेस्ट मॅनेजमेंट सोल्युशन प्रा.लि.चे संचालक व इतर 2 बोगस निविदाधारकांविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवून अटक करावी.

2)जिल्हाधिकारी चंद्रपूर,यांनी कलम 308 अन्वये दि.4/6/2025 व 5/06/2025 चे ठराव रद्द करून,मुख्याधिकारी आशिष चौहान यांना तात्काळ निलंबित करावे.

3)संचालक नगरपरिषद प्रशासन,यांनी विशेष लेखापरीक्षण पथक नेमून,अपहाराची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करावी.

                                'तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे.'

1)माहिती अधिकाराचा दि.24/4/2025 चा अर्ज.

2)न.प.कडून माहिती प्राप्त दि.8/5/2025 चे पत्र.

3)तिन्ही निविदाधारकांची प्रतिज्ञापत्रे  : स्टॅम्प व नोटरी प्रती(सलग सिरीयल नंबर व स्टॅम्प खरेदीतर्फे एकच व्यक्ती,एकच नोटरी वकील,सलग नोटरी,सिरीयल नंबर नोटरी दि.3/8/2024).

4)ठराव सर्वसाधारण सभा दि.4/6/2025.

5)तुलनात्मक तक्ता दि.4/6/2025.

6)ठराव स्थायी समिती दि.5/6/2025.

7)स्वीकृत पत्र दि.6/6/2025.

8)कार्यादेश दि.11/6/2025.

9)GPS टॅग असलेले सुरूवातीचे व शेवटचे फोटो.

10)मंजूर व अदा केलेल्या बिलाची प्रत(GST ची नाही.

अशाप्रकारे वरील बाबींची मुद्द्यांसह मांडणी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक अरविंद डोहे यांनी निवेदनातून केली असून माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार,राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे,यांनाही निवेदन पाठवण्यात आल्याचे कळते.संबंधित विभाग आता डोहे यांच्या तक्रारीची कितपत दखल घेतात,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.सदर प्रकरणी मुख्याधिकारी चौहान यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला परंतू,संपर्क झालेला नाही. 

#Nagar Parishad Gadchandur.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$