Shocking incident : विद्युत तारेच्या स्पर्शाने तरूणाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी!|Marathi News.

News@Shocking...

   Chandrapur : महाराष्ट्रात अलीकडील काळात विद्युत तारेच्या स्पर्शाने नागरिकांचा जागीच मृत्यू झाल्याच्या काही अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर 26 एप्रिल 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टा परिसरात तलाव खोलीकरणाचे काम करताना,पलटी झालेला ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पारोधी रोडवरील शेतात दिपक शंभरकर,यांचा मातीने भरलेला ट्रॅक्टर,ट्रॉलीसह पलटी झाला होता.यावेळी त्यांचा मुलगा सूरज दिपक शंभरकर वयवर्ष अंदाजे 27 व मजूर अक्षय शामदेव कापटे वयवर्ष अंदाजे 26 रा.शेगाव खुर्द,हे ट्रॉली सरळ करण्याचा प्रयत्न करत होते.ट्रॉली उचलण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी सळाख जोराने ओढताना ती थेट वरच्या विद्युत तारेला लागली.क्षणात दोघेही दूर फेकले गेले.या भीषण घटनेत अक्षय जागीच ठार तर सूरज गंभीर जखमी झाला आहे.यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तात्काळ सरपंच व पोलिसांना माहिती दिली.दरम्यान ग्रामस्थांनी तातडीने जखमी सूरजला उपचारासाठी चंदनखेडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.घटनेची पुढील तपास पोलीस करत आहे.

#Shocking Incident in Chandrapur District.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$