Gadchandur : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांविषयी सातत्याने आवाज उठवत प्रभावीपणे पाठपुरावा करणारे आ.सुधीर(भाऊ)मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून,महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या 16 एप्रिल गुरुवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.यामध्ये त्यांनी गडचांदूर व अंबुजा सिमेंट प्रकल्पालाही भेट दिली.राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी माहिती देताना सांगितले की,मागील काही दिवसां पासून गडचांदुरकर माणिकगड(अल्ट्राटेक)सिमेंट कंपनीच्या कचरा डम्पिंग यार्ड आणि कित्येक वर्षांपासून डस्ट प्रदुषणामुळे हैराण झाले आहेत.याविरोधात शहरातील काही सुज्ज्ञ नागरिकांनी गडचांदूर शहर प्रदूषण त्रस्त संघर्ष समितीची स्थापना केली.सध्याच्या परिस्थितीत कचऱ्याची दुर्गंधी बंद आहे.आणि डस्ट प्रदुषणावर येत्या 30 एप्रिलपर्यंत नियंत्रण आणले जाईल असे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


'काय म्हणाल्या पंकजाताई मुंडे.'
गडचांदूर येथील माणिकगड(अल्ट्राटेक) सिमेंट कंपनीच्या मुख्य गेटसमोर भेटीदरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या की,आज या माणिकगड सिमेंट कंपनी संभबंधाविषयी लक्षवेधी चर्चा उपस्थित केली गेली होती.आणि त्याला उत्तरादाखल मी पुर्ण अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन उत्तर दिले होते की,इथे जो कचरा जाळला जातो, त्याची प्रचंड दुर्गंधी होते.आणि ती दुर्गंधी बंद करून दिली जाईल. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी कारवाई करून दुर्गंधी बंद केलेली आहे. मी पर्यावरण मंत्री आहे आणि मला या पर्यावरणाची जाणिव करून द्यायची असेल तर मी स्वतः परिस्थिती बघीतली पाहिजे. माझ्या येण्याणे फार फरक पडणार असे आमदार साहेबांनी सांगितले,तर नक्कीच आहे.मला पुर्ण रस्त्यामध्ये जिथे जिथे कोळसाची खान आहे,तिथे तिथे भरपूर पाण्याचा सडा दिसला. जिथे कोल वाशरीज आहे,तिथे पाणी मुरलेला होता, स्वच्छता दीसली.आणि मला वाटते की माझ्या येण्यानी हा फरक पडत असेल तर तो झाला पाहिजे.आपल्याला या माणिकगडने शब्द दिला की,प्रदुषण पुर्णपणे संपुष्टात आणणाऱ्या सर्व उपाययोजना ते राबवणार आहे आणि प्रदुषण कमी करणार आहे. जसा आम्ही यांना आणि पुर्ण जिल्ह्यातल्या विविध उद्योगांना अत्यंत कडक असे,आदेश दिलेले आहेत.तसेच आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्लाॅन बनवत आहोत प्रदुषण कमी करण्यासंदर्भात आपण पावले उचलली पाहिजे,अवैध पद्धतीने परवानग्या दिल्या नाही पाहिजे, सगळ्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे,ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी कार्यरत राहू आणि प्रदुषणा पासून कमीत कमी लोकांना त्रास होईल याचा प्रयत्न भविष्यात आमच्याकडून असेल.यासाठी आपण सर्वांच्या सहकार्य राहु द्या. यावेळी मंचावर आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,आ.देवरावदादा भोंगळे,विवेक बोढे व भाजपाच्या महिला,पुरुष पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र तसेच वेकोलीच्या कोळसा खाणींमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर विषयावर आ. मुनगंटीवार यांनी 11 मार्च 2025 रोजी विधानसभेत तब्बल अर्धातास चर्चा उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच पर्यावरणीय हानीचा ठोस पद्धतीने ऊहापोह केला होता.त्यानंतरही त्यांनी हा विषय सातत्याने लावून धरत 26 फेब्रुवारी 2026 रोजी कोल वॉशरीज मधील अनियमितता व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर CBI चौकशीची मागणी विधानसभेत केली.तसेच 24 मार्च 2026 रोजी झरपट व इरई नद्यांच्या प्रदुषणाबाबत तसेच त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी चर्चेद्वारे मांडली.या सर्व प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभागृहात स्वतः चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. 'शेवटी,ताईंनी भाऊंना दिलेले आश्वासन पाळले' त्या आश्वासनाची पुर्तता म्हणून हा महत्त्वपूर्ण दौरा होता.दौऱ्या दरम्यान पंकजा मुंडे,या चंद्रपूरातील विविध उद्योगांची पाहणी करून गडचांदूर येथील माणिकगड(अल्ट्राटेक)सिमेंट व अंबुजा (अदानी)सिमेंट उपरवाही प्रकल्पालाही भेट दिली.यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

'गडचांदूर प्रदूषण त्रस्त संघर्ष समितीचे निवेदन.'
माणिकगड सिमेंट कंपनी शहरात मोठ्या डोलाने डौलत आहे. परंतु सदर कंपनी शहराच्या मधोमध आहे.कंपनीला याचा विसर पडलेला दिसतो.मागील अनेक वर्षापासून कंपनीमध्ये,ए.एफ. आर.अंतर्गत शहराच्या मधोमध डंपिंग यार्ड उभारले.त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून,अक्षरशः लहान-मोठे इसमांना मोकळा श्वास घेता येत नाही.ए.एफ.आर.च्या माध्यमातून ड्राय वेस्ट नावाखाली,वेगवेगळ्या राज्यातून महानगरपालिकेचे प्लास्टिक युक्त घान,दुर्गंधी युक्त घनकचऱ्याचा वापर केला जात आहे.त्यामुळे येथील जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात हगवण,उलट्याचे प्रमाण सुरू झाले आहे.आणि डस्ट वायू प्रदूषणामुळे येथील जनतेला जगणे कठीण झाले आहे.या वायू प्रदूषणामुळे येथील जनता मोठमोठाल्या आजाराने ग्रस्त असून कंपनी सभोवतालच्या शेती अक्षरशः उध्वस्त झाल्या,शेत जमिनीचा कस उतरलेला आहे.या सर्व विषयाला एकमेव माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार आहे. आधीच दोन प्लांट मुळे शहरात मानवी वस्तीस धोका निर्माण झाला असून,तिसऱ्या युनिटला परवानगी देणे हे शहरासाठी आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे.सदर या थर्ड प्लांटच्या युनिटला कुठलीच परवानगी देण्यात येऊ नये.आपण आपल्या जवळ असलेल्या अधिकाराचा वापर करून या माणिकगड सिमेंट कंपनीवर तात्काळ कारवाई करून,ए.एफ. आर.डम्पिंग यार्ड कायमचे बंद करून,स्थलांतर करावे.डस्ट प्रदूषणावर कियदेशीर कारवाई करून याचा कायमचा बंदोबस्त करावा,अशी मागणी वजा विनंती करत थर्ड युनिटला समितीने तिर्व विरोध दर्शविला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाऊंनी केलेल्या सातत्यपूर्ण,अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामळेच हा दौरा आयोजित करण्यात आला होता.यामुळे जिल्ह्याच्या पर्यावरणीय विषयांवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना गडचांदूरकरांच्या जीवाला ताप बनलेली माणिकगड (अल्ट्राटेक)सिमेंट कंपनी प्रशासनाची अरेरावीवर अंकुश लागणार का? येथील प्रदुषणाची समस्या कायमची मार्गी लागणार का?हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Pankaja Munde in Gadchandur City.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
