Gadchandur : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचे सत्र सुरू आहे.असे असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने 16 एप्रिल रोजी गडचांदूर शहरातील माशाअल्लाह बिर्यानी सेंटर समोर मुंबई इंडियन V/s पंजाब किंग्स IPL सामन्यावर www.nice77 77.fun,या ऑनलाईन बेटींग आय.डी.वर क्रिकेट सट्टा खेळतांना जुबेर रसुल सैय्यद वयवर्ष 22 रा.ढुमने ले-आउट गडचांदूर,याला ताब्यात घेवून,त्याच्याकडून एक मोबाईल(किं.अं.20 हजार),जप्त करून त्याला बेटींग आय.डी.पुरविणारा रोहीत काकडे रा.गडचांदूर,या दोघांविरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशन,येथे अपराध क्रं.261/ 2026 कलम 12(अ)महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनयम व सहकलम 49 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.दिपक कांक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकार,सफौ.स्वामीदास चालेकर, पोहवा.अजय बागेसर,किशोर वैरागडे,पोअं.गोपीनाथ नरोटे,शेखर माथनकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांनी केली आहे.
#Action By LCB Chandrapur.#IPL Cricket Batting.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
