Gadchandur : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी गडचांदूर नगरपरिषदेचा अजब गजब कारभार नुकताच समोर आला आहे. ऐन उन्हाळ्यात येथील विरोधी पक्ष भाजपच्या एका दलित महिला कार्यकर्त्याच्या घराचे चक्क नळ कनेक्शन कापण्यात आल्याची माहिती आहे.शारदा बबन फुसाटे राहणार शास्त्री नगर,प्रभाग क्रमांक 4,असे महिलेचे नाव आहे.हे सर्व सत्ताधाऱ्यांच्या सुडाच्या राजकारणाचे फलीत असून घराची कोर्टात केस सुरू आहे,सदर महिलेला कोर्टाने स्टे ऑर्डर(Stay Order)दिला आहे.प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुध्दा केवळ राजकारणाच्या दबावाखाली येऊन एका महिलेच्या घराचे नळ कनेक्शन कापण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहे. 'हेच का तुमचे शहर विकासाचे व्हिजन' अशी विचारणा संबंधितांकडून केली जात असून या अन्यायाच्या विरोधात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर अन्यायग्रस्त महिलेला सोबत घेऊन नगर परिषदेच्या संबंधीत विभागाला निवेदन देऊन बेकायदेशीर कापण्यात आलेले नळ कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची विनंती केली आहेत.Amazing News.
दिलेल्या निवेदनानुसार,मी(शारदा बबन फुसाटे)शास्त्री नगर प्रभाग क्रं.4,या पत्त्यावर एकटी राहत असून मागील जवळपास 10 वर्षापासून माझ्याकडे नळ कनेक्शन आहे.दरवर्षी नियमित पाणीपट्टी सुद्धा भरत आहे.माझे व माझ्या पतीमध्ये वाद असल्याने ते सध्या दुसऱ्या पत्नीकडे राहतात.मी एकटीच या घरात राहत असून मला घरातून काढण्यासाठी माझे पतीने मला खुप त्रास दिला आणि देत आहेत.राहण्यासाठी माझ्याकडे दुसरी कुठलीच व्यवस्था नसल्याने मी कोरपना कोर्टात दावा दाखल केला.आणि मा.कोर्टाने माझ्या बाजूने स्टे आर्डर दिला आहे. 'त्या घरात राहण्यास मज्जाव करू नये' कोर्टाने असे स्पष्ट नमूद केले असून सदर आर्डरची प्रत न.प.कडे दिली होती.असे असतानाही पाणी पुरवठा विभागाने कोणतीही पुर्व सुचना न देता 18 एप्रिल 2026 रोजी घराचे नळ कनेक्शन कापून मा.कोर्टाचा अवमान केला आहे.हे कृत्य बेकायदेशीर असून माझ्यावर अन्याय झाल्याचे शारदा फुसाटे यांचे म्हणणे आहे.कापण्यात आलेले नळ कनेक्शन पुवर्वत जोडून द्यावे,अशी मागणी फुसाटे यांनी निवेदनातून केली आहे.Politics of Revenge.
वास्तविक पाहता,पाण्यासारख्या जीवनावश्यक व मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवता येत नाही.मात्र,याठिकाणी ऐन उन्हाळ्यात पाणी कनेक्शन कापण्यात आले आहे.ही बाब आश्चर्यचकित करणारी असून 'सदर घराचे नळ कनेक्शन 24 तासांच्या आत विनाशुल्क पुर्ववत जोडून द्यावे,नळ कनेक्शन जोडल्याचे मला लेखी स्वरुपात कळवावे,मा.कोर्टाचे आदेश डावलून नळ कनेक्शन कापणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून मला त्याबाबतची माहिती द्यावी,अन्यथा मा.कोर्टात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शारदा फुसाटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.सर्व कागदपत्रांसह निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार कोरपना,पोलीस निरीक्षक गडचांदूर यांना देण्यात आल्याची माहिती आहे.निवेदन देताना भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे,तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.स्मिता चिताडे, महिला आघाडी कार्यकारिणी सदस्या सौ.शारदा फुसाटे,महिला आघाडी शहराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.शितल धोटे, नगरसेविका सौ.कीर्ती वैरागडे,युवा अध्यक्ष विक्की उरकुडे, नगरसेवक हिमांशू नामवाड,नगरसेक सुरेश मेश्राम,नगरसेवक सुरज पांडे,सचिन चुरे,गणेश आदे,रोहन राठोड,गणपत बुरटकर, गुप्ताजीसह इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सत्ताधारी एकीकडे शहरभर मोठमोठे बॅनर लावून 'प्रत्येक घर नळ' देण्याची घोषणा करत आहे.मात्र,दुसरीकडे विरोधी पक्षाच्या महिलेच्या घराचे जाणिवपूर्वक नळ कनेक्शन तोडून सुडाचे राजकारण करीत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे.यावर आता नगरपरिषद काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Amazing News.#Gadchandur Nagar Parishad.Politics of Revenge.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
