Chandrapur : जिल्ह्यातील नेरीवरून जवळ असलेल्या तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मोटेगाव,येथील कक्ष क्र.38 मध्ये बकऱ्या चारायला गेलेल्या एका गुराख्याचा पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 31 मे रोजी सकाळी अंदाजे 10 च्या दरम्यान घडली.दिलीप जानबा ननावारे वयवर्ष 45 रा.मोटेगाव,असे मृत गुराखीचे नाव असून त्याच्या मागे एक मुलगा,मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याचे चित्र असून वाघाच्या हल्ल्यातील हा 20 वा बळी आहेत.tiger attack.
दिलीप नेहमीप्रमाणे मोटेगाव ते पेंढरी मार्गावारील बद्री पहाडीच्या खाली कक्ष क्र.38 मध्ये सकाळीच बकऱ्या चारण्यासाठी गेला. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत दिलीपला जागेवरच ठार करून जवळपास 500 मीटर दूर ओढत जंगलात नेला.वाघाने हल्ला केला तेव्हा बकऱ्या सैरावैरा पळत घरी परत आल्या,वडील मात्र घरी आले नव्हते.काही वेळे नंतर मुलाने वडिलांना फोन केला पण,समोरून प्रतिसाद मिळत नसल्याने काही लहान मुलांना घेऊन तो जंगल परिसरात वडिलांना शोधायला गेला.तेव्हा त्याला जंगलात वडिलांचे फाटके कपडे व कुऱ्हाड मिळाली.सर्व मुले गावात पळत आले आणि याची माहिती गावकऱ्यांना दिली.गावातील तरुण मुले आणि गावकऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेत संपूर्ण परिसर अक्षरशः पिंजून काढला.तेव्हा मृत्यूदेह आढळुन आला.
सदर वाघ सकाळी 8 च्या सुमारास त्याच परिसरातील रोप वाटिकेला पाणी टाकणाऱ्या महिला मजुरांना रस्ता ओलांडतांना दिसला.तर काही रहदारी करणाऱ्या नागरिकांनाही तो जंगलात जाताना दिसला.या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक आणि वनविभागाची संपुर्ण टीम तसेच पोलिस निरीक्षक दिनेश लबडे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा,अशी मागणी यावेळी गावकऱ्यांन केली आहे.
#Tiger Attack Chimur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
