The Family went to the wedding; thieves stole...कुटुंब बाहेरगावी अन्...चोरांचा कारनामा!घरातील सोने व पैशांवर डल्ला! Marathi News.

News@Crime...

  Korpana : गडचांदूरवरून अवघ्या 4 किमी.अंतरावर असलेल्या राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील शेवटच्या टोकावर,अंबुजाफाटा जवळील हरदोना(खु),येथे 21 मे रोजी रात्रीच्या सुमारास सतीश शिंदे,यांच्या घरी चोरीची घटना घडली.शिंदे कुटुंब हिंगणघाट येथे एका नातेवाईकांच्या लग्न समारंभात गेला होते.ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची अंगठी 4 ग्राम,पदक 3 ग्राम,बेसर व झुमके,असे एकूण एक ते दिड लाखांचे सोने आणि रोख रक्कम 10 ते 12 हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.चोरटे शिंदे यांची दूचाकी नेण्याच्या प्रयत्नात होते. मात्र,हॅण्डल लॉक असल्यामुळे दुचाकी नेता आली नाही.घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हा कारनामा केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफराजा शेख,यांच्या नेतृत्वात चोरांचा शोध सुरू आहे.Increase in theft incidents.

                                     'गावकऱ्यांची मागणी.' 

      हरदोना येथे चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, काही महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास येथील 'सुरेश शेंडे' यांची दुचाकी चोरीला गेली.आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. याचबरोबर किरकोळ चोरीच्या घटना सुद्धा या गावात घडत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अशा घटनांवर आळा घालण्याची गरज असून अंबुजा फाटा येथे पोलीस चौकी स्थापन करावी,रात्रीच्या सुमारास परिसरातील खेडेगावात पोलिसांनी गस्त करावी,अशी मागणी वजा विनंती यानिमित्ताने गावकऱ्यांनी केली आहे.आता शासन-प्रशासन या मागणीकडे लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#Crime news.# Hardona thieft News.#The Family went to the wedding; thieves stole....

                     $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$