Murder Suspect Arrested : धोपटाळा महिला हत्याकांडातील आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या!| Marathi News.


News@Murder Case.

Rajura : येथील वेकोलि(WCL)च्या धोपटाळा कामगार वसाहती मध्ये शितल रणधीर कुंभारे,या 36 वर्षीय विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 29 मे च्या मध्यरात्री घडली होती.LCB चंद्रपूर आणि राजुरा पोलीस स्टेशन,यांच्या संयुक्त पथकाने सदर हत्येतील आरोपी राजेश व्यंकय्या अटल्ला वयवर्ष 31,याला 24 तासांच्या आत तेलंगणा राज्यातील मंचेरियाल,येथून अटक केली आहे.चंद्रपूर येथील महाकाली कॉलनी,कपिल चौक,येथील रहिवासी,शीतल उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलीसह धोपटाळा, येथील आपल्या माहेरी आली होती.दरम्यान आरोपीने घरात घुसून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.Rajura Murder Case.

                                       'हत्येचे कारण समोर.' 
मृत शीतल आणि आरोपी राजेश हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.शीतलच्या आजी तेलंगणातील मंचेरियाल येथे राहत असल्याने तिथलाच रहिवासी राजेश,याच्यासोबत तिची जुनी ओळख होती.वर्गातही दोघे एकत्र होते.यादरम्यान राजेश ने शीतल पुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला असता तिने होकारही दिला होता.मात्र,दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाल्या.यानंतर सुद्धा राजेश शीतलच्या संपर्कात होता.या काळात शीतलने राजेशकडून अनेकदा पैसेही घेतले होते.मात्र,छोट्या-छोट्या कारणांवरून होणाऱ्या वादांमुळे शीतलने 2024 मध्ये राजेशला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते.नंतर महिन्याभरा पुर्वीच शीतलने राजेशला पुन्हा अनब्लॉक केले.राजेश तिला सतत मेसेज करायचा,मात्र,ती त्याला कोणताही रिप्लाय देत नव्हती.विशेष म्हणजे शीतल रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर ऑनलाईन असायची.पण,राजेशच्या मेसेजला उत्तर न देता ती दुर्लक्ष करायची,ज्यामुळे राजेशच्या मनात वेगळीच शंका आली आणि तीव्र संताप निर्माण झाला.काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात पुन्हा थोडे बोलणे सुरू झाले होते.घटनेच्या दिवशी शीतलचे भाऊ आणि आई बाहेरगावी गेल्याने तिने राजेशला भेटण्यासाठी घरी बोलावले.मात्र,आधीच मनात सूडाची भावना आणि इतक्या वर्षांचा राग धरून बसलेला राजेश शीतलचा काटा काढण्याच्या हेतूनेच चंद्रपुरात आला.रात्रीच्या अंधारात त्याने शीतलचा गळा चिरून हत्या केली आणि कोणालाही शंका येऊ नये म्हणून अत्यंत चलाखीने रात्रीच बस पकडून आपल्या गावी तेलंगणात निघून गेला.अशी कबुली आरोपी राजेश ने दिली.सुरुवातीला या गुन्ह्यात पोलिसांना कोणताही सुगावा नव्हता,मात्र नेमलेल्या पथकाने तांत्रिक व सायबर तपास करत आरोपी राजेशचे लोकेशन शोधून काढले आणि मंचेरियाल येथे जाऊन त्याला अटक केली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB चे पथक,राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफराजा शेख आणि त्यांची टीम तसेच सायबर सेलने केली आहेत.

One arrested in the murder case of a woman in Dhoptala Colony.

#Murder Suspect Arrested.#Crime News.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$