Illegal Sand Transportation : अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई.|Marathi News.

News@Crime....

     Chandrapur : जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गौणखनिजांच्या चोरट्या वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा(LCB)आणि पोलीस प्रशासनाने आपली धडक मोहीम तीव्र केली आहे.याच श्रेणीत 20 मे रोजी LCB च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंतरगाव नाला परिसरात एका मोठ्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर छापा टाकून 6 लाख,5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून एक विना नंबरच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर,रेतीची अवैध वाहतूक करताना मिळून आला.पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,सदर रेती उत्खनन व वाहतुकीबाबत कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे आढळून आले नाहीत.यावरू ट्रॅक्टर चालक अनिल मनोहर राऊत वयवर्ष 36 रा.पाथरी ता.सावली जि.चंद्रपूर,याला अटक करून एक विना नंबरची ट्रॅक्टर व ट्रॉली,किंमत अंदाजे 6 लाख,1 ब्रास रेती किंमत अंदाजे 5 हजार,असा एकूण 6 लाख,5 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

   सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPOसत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.

#Chandrapur Crime news.#Illegal Sand Transportation. #Action by LCB Chandrapur.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$