Electric Bus Fire, Accident: परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसला आग!|Marathi News.

News@Electric Bus...

                 Chandrapur : गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावरील घंटा चौकाजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(MSRTC)च्या एका इलेक्ट्रिक बसने अचानकपणे पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बस गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन जात असतांना,बसने अचानकपणे पेट घेतला.सुदैवाने सगळे प्रवासी ऐनवेळी सुखरूप बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमध्ये 43 प्रवासी होते.ते सर्व सुरक्षित बचावले आहेत.या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.बसला आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. चालकाने प्रसंगवधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सदर घटना 8 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.इलेक्ट्रिक बसला आग लागल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

#Shocking News.

#chandrapur #Gadchiroli #ST Bus #Electric Bus fire #Accident #maharashtra transport #breaking news #road accident #passenger safety.

                                  $$$$$$$$$$$$$$$$$$$$