Sand Smuggling is a Big Problem in Korpana Taluka : अवैधरित्या रेती वाहतुकीचा 15 दिवसात दुसरा बळी!|Marathi News.

News@Sand Smuggling...

             Korpana : तालुक्यातील भोयगाव-भारोसा रेती घाटावर भोयगाव कवठाळा व परिसरातील काही सराईत रेती माफियांनी हल्ली मोठ्याप्रमाणात उच्छाद मांडला आहे.घरकुलाच्या आडोशात याठिकाणी रेतीची अवैधरित्या तस्करी होत असून एकाच टिपीवर अनेक चकरा मारायच्या नादात निष्पाप लोकांचा नाहक बळी जात आहेत.रेती संदर्भात वारंवार प्रसारित होत असलेल्या बातम्या पाठोपाठ संबंधीतांना प्रत्यक्ष फोन करूनही कारवाई होत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत.अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणारच नाही,अशी शपथ घेतली का?अशी विचारणा करत महसूल व पोलीस विभाग, LCB,RTO,यांचं नेमकं चाललंय तरी काय!असे एक ना अनेक प्रश्न जनतेला पडले आहे.'येथे' रेती तस्कर निष्पाप लोकांच्या जीवावर उठल्याचे आरोप होत असून बंद असलेल्या भारोसा घाटातून एका मागून एक ट्रॅक्टर रेती भरून निघतातच कसे! यामध्ये त्याठिकाणी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची भुमिका संशयास्पद ठरत असून अवैध रेती माफियांवर कारवाईचा बडगा उगारण्याची नितांत गरज आहे.यांच्याकडून बेदरकारपणे सुरू असलेल्या अवैधरित्या रेती वाहतुक निष्पाप लोकांच्या जीवावर बेतत असून पुर्वीपेक्षा गेल्या 15 दिवसाच्या कालावधीत 2 गंभीर अपघात घडले आहे.ज्यामध्ये एका तरुणाचा पाय कापावा लागल्याने त्याचा आयुष्य उद्ध्वस्त झाला तर दुसऱ्या अपघातात महिलेच्या पायाची हाड मोडली आणि दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

                                           "पहिली घटना" 

गेल्या 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 च्या सुमारास निमणी-बाखर्डी मार्गावर रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने श्रीकांत राजूरकर नामक 38 वर्षीय तरूणाला जोरदार धडक दिली.या अपघातात श्रीकांतच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कवटी तुटली,मेंदूला मार लागला,रुग्णालयात दाखल करून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.याशिवाय ट्रॅक्टर त्याच्या शरीरावरून गेल्याने हाताच्या 2 बोटांना गंभीर फ्रॅक्चर झाले, छातीला जबर मार लागला तसेच उजवा पाय कापावा लागला.या घटनेमुळे त्याच्या नशिबी कायमस्वरूपी अपंगत्व आले असून सध्या त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.प्रकृती चिंताजनक असून आतापर्यंत 5 लाखांच्या वर खर्च झाला आणि पुढील उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.दरम्यान या घटनेनंतर श्रीकांतचे वडील गजानन गणपती राजूरकर,यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ आर्थिक मदत देण्याची व या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

                                               "दुसरी घटना."

        प्राप्त माहितीनुसार,गुरूवार दिनांक 9 एप्रिल रोजी भोयगाव-भारोसा रेती घाट बंद होता.असे असताना रेती भरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रॅक्टरने कवठाळा जवळील पेट्रोल पंपाजवळ एका दुचाकीला धडक दिली.या अपघातात बाखर्डी येथील एका 40 वर्षीय महिलेच्या पायाची हाड मोडली तर पती गंभीर जखमी झाला आहेत.सध्या महिलेच्या पायावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कळते.अपघातानंतर  'तो मी नव्हेच' असे भासवत ट्रॅक्टर चालकाने तेथील पेट्रोल पंपाजळील एका पंक्चरच्या दुकाना पुढे ट्रॅक्टर लाऊन,माझे ट्रॅक्टर पंक्चर आहे.हा अपघात मी नाही केल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून सदर ट्रॅक्टर दोन वर्षांपूर्वी एका बचत गटाकडून घेऊन याचा वापर रेती तस्करीसाठी केला जात असल्याची चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहे.सदर  अपघाताच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी असंवेदनशीलतेचा कळस गाठण्यात आला असून वास्तविक पाहता माणुसकीच्या नात्याने अपघातानंतर पाय मोडलेली बाई रस्त्यावर पडलेली असताना मदत करण्याऐवजी,ट्रॅक्टरचे फोटो का काढले म्हणून ट्रॅक्टर मालकाने जखमी पतीची कॉलर पकडून धमकावण्याचा गंभीर प्रकार सुद्धा त्यावेळी घडल्याची माहिती आहे.भारोसा रेती घाटावर सुरू असलेल्या रेती माफियांचा आतंक संपुष्टात आणण्याची गरज आहे.मात्र,संबंधीतांची उदासीनता लक्षात घेता कारवाई कोण करणार? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. 

Sand Smuggling is a Big Problem in Korpana Taluka. 

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$