MLA Deorao Dada Bhangle : जे इतरांना जमले नाही ते दादांनी करून दाखवले!|Marathi News.

News@Gadchandur Bus Stand...

           Chandrapur : जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराची लोकसंख्या 45 हजारांच्या जवळपास आहे.मोठी बाजारपेठ,शासकीय, निमशासकीय कार्यालय,शाळा-महाविद्यालय असल्याने दररोज शेकडो नागरिक याठिकाणी येतात.मात्र,येथे सुसज्ज असे बसस्थानक नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.बरेचश्या लोकप्रतिनिधींनी या क्षेत्राचे नेतृत्व केले.मात्र,जनतेच्या या ज्वलंत प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले.बसस्थानकासाठी अनेक आंदोलने झाली,सकारात्मक काही घडले नाही.याच दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवराव (दादा)भोंगळे,हे निवडून आले.निवडणुकी दरम्यान त्यांनी गडचांदुरकरांना दिलेला शब्द अवघ्या एका वर्षात पूर्ण करून दाखवला आहे.गडचांदूर शहराच्या विकासातील एक अत्यंत सुवर्णक्षण आज उजाडला असून आमदार भोंगळे,यांच्या अथक पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र शासनाने गडचांदूरात अत्याधुनिक सुविधायुक्त अशा नवीन बसस्थानकाच्या निर्मितीसाठी 10 कोटींचा भरीव असं निधी मंजूर केला आहे.गडचांदूरकरांची प्रतिक्षा आता संपली असून यामुळे शहराच्या विकासाचा एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला,यात दुमत नाही."आजपर्यंत जे इतरांना जमले नाही,ते दादांनी करून दाखवले" अशी कौतुकास्पद चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे.           देशाच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण होऊनही गडचांदूरसारख्या महत्त्वाच्या शहरात हक्काचे एसटी बसस्थानक नव्हते,ही मोठी शोकांतिका होती.दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी,सिमेंट उद्योगातील कामगार,शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना आणि विशेषतः लहान मुलांचा मातांना उन्हाळा,पावसाळ्यात उघड्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती.पिण्याचे पाणी, स्वच्छतेचा अभाव,अशी विविध सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने जनतेत मोठा असंतोष होता.जनसामान्यांची ही वर्षानुवर्षांची वेदना ओळखून आमदार देवराव भोंगळे,निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून या प्रश्नाला निकाली काढण्याचा ध्यास घेतला होता.अशातच याठिकाणी बसस्थानक निर्मिती करीता जागेचा मोठा प्रश्न होता.त्यामुळे त्यांनी सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुरावा करून तो प्रश्न निकाली काढला आणि बसस्थानक करीता हा निधी खेचून आणला.केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देत विधानसभेच्या अधिवेशनात जोरदार आवाज उठवत या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.शासन दरबारी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,परीवहन मंत्री प्रताप सरनाईक,राज्यमंत्री माधुरी मिसाळ,यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी या बसस्थानकाची कोंडी फोडली.याचीच फलश्रुती म्हणून राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात विशेष शासन निर्णय निर्गमित करून या कामाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे.                    'बघा बसस्थानकात काय सुविधा असतील.' 

     सदर बसस्थानक हे अत्यंत आधुनिक स्वरूपाचे असणार आहे. यामध्ये तळमजल्यावर प्रशासकीय कार्यालय,पहिल्या मजल्यावर कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह,भव्य वाहनतळ,पेव्हरब्लॉक, आकर्षक कुंपण भिंत आणि गेट,अशा सुविधा असतील.तसेच, पर्यावरणाचा विचार करून रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा व CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत.विशेष म्हणजे,माता-भगिनींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित कक्षाची तरतूद या इमारतीत करण्यात आली आहे.

                'या ऐतिहासिक यशाबद्दल आ.भोंगळे म्हणाले...'

गडचांदूर ही केवळ एक औद्योगिक नगरी नसून या भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.येथे सुसज्ज बसस्थानक असणे काळाची गरज होती.या 10 कोटींच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या बसस्थानकामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.त्याचबरोबर प्रवाशांना सन्मानाने प्रवास करता येईल. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या इमारतीचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल,अशी माहिती आमदार देवरावदादा भोंगळे यांनी दिली आहे.

                                  'नागरिकांची प्रतिक्रिया.'

   खरं म्हटलं तर,स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचांदूरकरांना अशा प्रकारचे अत्याधुनिक बसस्थानक मिळत आहे.दादांनी निवडणुकीत दिलेला शब्द पुर्ण केल्यामुळे समाधान आहे.या बसस्थानकामुळे शहराच्या सौंदर्यात आणि प्रगतीत निश्चितच मोठी भर पडणार असल्याची प्रतिक्रिया देत नागरिकांनी दादांच्या अशा विकास कामांचे तोंडभरून कौतुक केले आहेत.एकुणच गडचांदुरकरांची प्रतिक्षा आता संपली असून सुसज्ज असे बसस्थानक याठिकाणी होणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहेत.

#MLA Deorao Bhangle.

                             $$$$$$$$$$$$$$$$$$$$$