Gadchandur : "प्रभु रामाचं उदाहरण,एक आदर्श उदाहरण आहे. राजा कसा असावा,भाऊ कसा असावा,मुलगा कसा असावा, याचा मुर्तिमंत्र उदाहरण म्हणजे,प्रभु राम.प्रभु श्रीरामाच्या जन्मानिमित्य आपण 'रामनवमी' साजरी करतो.25 जानेवारी 2025 ला जेव्हा अयोध्येत भव्य राम मंदिरामध्ये मुर्तीची स्थापना झाली.संपुर्ण देशातील रामभक्तांचा उत्साह अत्यंत शिगेला पोहोचला.ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो,तो क्षण राम भक्तांनी बघितला.ज्यावेळी मंदिराची स्थापना झाली, त्यावेळी छोट्या छोट्या गावापासून तर मोठमोठ्या शहरांमध्ये आपण श्रीराम नवमीचा उत्साह साजरा केला.आज येथे सुद्धा सर्व रामभक्तांनी मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा काढली.मी प्रभु रामाच्या चरणी प्रार्थना करतो,सर्वांच्या आशा आकांक्षा पुर्ण करत,सर्वांना उदंड,निरोगी आयुष्य लाभो,अशी प्रार्थना करतो. असे मौलिक मत राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी व्यक्त केले.ते 26 एप्रिल रोजी गडचांदूर येथे प्रभु श्रीराम जन्मोत्सव समीतीतर्फे आयोजित रामनवमी शोभायात्रेला दिलेल्या भेटी दरम्यान बोलत होते. 

सायंकाळी 6 च्या सुमारास स्थानिक हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.ही शोभायात्रा वीर बाबूराव शेडमाके चौक,महात्मा फुले चौक,संविधान चौक(बसस्थानक), श्री विठ्ठल मंदिर,दत्त मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशाप्रकारे शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत अचानक चौकातील श्री दुर्गा माता मंदिर समोरील पटांगणावर समाप्त झाली.


या भव्यदिव्य अशा शोभायात्रेला आमदार भोंगळे यांनी भेट देऊन सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.'जय श्रीरामाच्या जयघोषाने परिसर अक्षरशः दुमदुमले होते.'भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा' या गाण्यावर तरुणाईचा डांस लक्षवेधी ठरला. महिलांची संख्या लक्षणीय होती.बालगोपाल व तरुणाईचा उत्साह वाखणण्याजोगा होता.एकुणच या शोभायात्रेत गडचांदूर तथा परिसरातील समस्त रामभक्तांनी सहभाग नोंदवून शोभा यात्रेची शोभा वाढवली.समारोपानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.भाविक-भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शोभायात्रे दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, शोभायात्रेला गालबोट लागू नये,यासाठी खबरदारी म्हणून गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
#Ram Navami Festival 2026. #Marathi News. ----------//---------
