Chandrapur : जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या गोवंशीय जनावरांच्या तस्करीवर पोलिसांकडून मोठ्याप्रमाणात कारवाईचे सत्र सुरू असताना 8 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोयगांव-गडचांदूर मार्गावर नाकाबंदी करून गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या एका ट्रकला पकडून, त्याची पाहणी केली असता,त्यामध्ये एकूण 52 गोवंश जनावरे (बैल,गाय,गोरे,त्यातील 3 जनावरे मृत)अमानुषपणे भरून कत्तलीसाठी नेत असतांना मिळून आले.यावरून एक ट्रक आणि त्यातील 52 नग गोवंशीय जनावरे असा एकूण किं.अं.40 लाख, 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक सादीक कुरेशी रा. गडचांदूर,याला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात,LCB पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात,सपोनि.दिपक कॉक्रेडवार,पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.सर्वेश बेलसरे, सफौ.स्वामीदास चालेकर,पोहवा.अजय बागेसर,पोहवा.किशोर वैरागडे,चापोहवा.प्रमोद डंभारे,पोअं.गोपीनाथ नरोटे,चापोअं. वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहेत.
#Action by Local Crime Branch Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
