Chandrapur : जिल्ह्यातील नागभीड तालुका,येथील मिंथुर गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रवीवार 4 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. हरिदास महादेव कुबडे वयवर्ष 58,असे मृत शेतकऱ्याचे नाव असून,त्यांच्या मृतदेहाचे अवशेष शेतात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले.या गंभीर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.A 58-year-old man was killed in a tiger attack in Nagbhid.
प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी कुबडे,हे सकाळी मोहफुले वेचण्यासाठी शेतात गेले.सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.दरम्यान,सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांचा पुतण्या अक्षय शेतात गेला असता,त्याला वाघ, वाघीण आणि 3 बछडे दिसले.त्यांना पाहून तो घाबरला आणि तात्काळ गावात येऊन माहिती दिली.यानंतर वनविभाग व पोलिसांना कळविण्यात आले.संबंधित पथकाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली.मात्र,त्यांच्या हाती काहीही लागला नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध घेतल्यावर कुबडे यांचे अवशेष छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. यावरून वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात वाघ,वाघीण व त्यांच्या 3 पिल्लांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त होत असून,गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुढील तपास सुरू असून एकटे शेतात जाऊ नये व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
#Chanerapur District News Apdate.#Tiger Attack Case.#A 58-year-old man was killed in a tiger attack in Nagbhid.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
