Chandrapur : मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा(LCB)व सावली पोलीस स्टेशन,येथील अधिकारी व अंमलदा,यांच्या पथकाने नागपूर येथे जावून घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार रमेश वेलादन शेट्टी रा.चंद्रपूर(हल्ली मुक्काम दिघोरी नागपूर)याला नागपूरला जाऊन ताब्यात घेतले.LCB व सावली पोलीस स्टेशनच्या पथकाने समांतर तपास करून आरोपीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील 3 सोनाराकडून सावली पोलीस स्टेशनातील अपक्रं. 107/2025 कलम 305(अ), 331(4)भारतीय न्याय नसंहिता,पोलीस स्टेशन मुल अपक्रं.252/ 2025 कलम 305(अ),331(4)भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेले व सोनाराकडे विक्री केलेल्या सोन्याचे दागिन्याची लगड एकूण 112 ग्रॅम एकूण 16 लाख,80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मुलचे SDPO सत्यजित आम्ले, यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांच्या नेतृत्वात प्रदिप पुल्लरवार,पोनि.सावली,सपोनि.दिपक कांक्रेडवार, सपोनि.बलराम झाडोकार,पोउपनि.संतोष निंभोरकर, पोउपनि.सर्वेश बेलसरे,पोउपनि.विनोद भुरले.पोउपनि.सचिन मुसळे,सफौ.धनराज करकाडे, पोहवा.चेतन गज्जलवार,पोहवा. सुरेद्र महतो,पोहवा.मोहन दासरवार,गोपीनाथ नरोटे,शेखर माथनकर,प्रफुल्ल गारघाटे,अजित शेंडे,सुमीत बरडे,धिरज पिदुरकर,अशोक मडावी,मिलींद टेकाम,गजानन मडावी यांनी केली.सदरची कारवाई LCB चंद्रपूर व सावली पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या केली आहे.
#Action by LCB Chandrapur & Sawli police.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
