Chandrapur Crime : रेकॉर्डवरील आरोपीकडून सोने व चांदीचे दागिने व दुचाकी जप्त!| Marathi News.

News@Crime...

  Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये चंद्रपुर शहरात प्रोव्हीशन,जुगार रेड,मोटार सायकल चोरी व घरफोडीतील आरोपींना चेक करणे कामी 3 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलींगवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी तनवीर कदीर बेग वयवर्ष 23,शिवम उर्फ कट्ट्या अनिल कुडकेलवार वयवर्ष 26(दोन्ही रा.भंगाराम वार्ड चंद्रपूर)यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सोने चांदीचे दागिने किंमत अंदाजे 1 लाख,25 हजार व एक जुनी वापरती हिरो स्पेन्डर दुचाकी क्रमांक MH/34/AU/8490 जप्त करण्यात आली.विशेष म्हणजे सदर कारवाई दरम्यान चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन व परिसरातील लक्ष्मीनगर,कन्नमवार नगर,तसेच येथील 2 गुन्हे उघडकीसह आणले असून पुढील तपासासाठी आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा. सतिश अवथरे,पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार,पोहवा.दिपक डोंगरे, पोहवा.इम्रान खान,पोअं.हिरालाल गुप्ता,पोअं.किशोर वाकाटे, पोअं.शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी व कर्मचारी,यांनी केली आहे.

#Crime New.#Chandrapur Crime Apdate.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$