Action by LCB Chandrapur : गांजा विक्रेत्यावर LCB ची कारवाई!| Marathi News.

News@Crime...

            Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे अधिकारी व अंमलदार यांना 2 एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाली की,पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अब्दुल शाहरूख अब्दुल रज्जाक वयवर्ष 35 रा.दर्गावार्ड घुटकाला व मोबीन रा.चंद्रपूर,यांनी मिळून रहमत नगर KGN लॉनजवळ चंद्रपूर,येथील साबीराबी रफिक शहा यांच्या घरी एक रूम किरायाने घेवून तेथे विक्रीसाठी गांजा ठेवला आहे.अशा माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता असता रूममध्ये एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बोलीतील पॉलीथीन मध्ये मिळून आलेला गांजा सदृश्य हिरवट रंगाची सुकलेली वनस्पती पाने,फूल,देड व बिया असलेली,एकूण वजन 8 किलो 915 ग्रॅम,निव्वळ गांजा वनस्पतीचे वजन 8 किलो 795 ग्रॅम पिवळ्या रंगाची प्लास्टिक बोरीचे वजन 120 ग्रॅम,बाजार भावानूसार गांजाची अंदाजे किंमत प्रति किलो 10 हजार प्रमाणे किंमत 89 हजार 150 रूपयाचा माल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि.बलराम झाडोकर,पोउपनि.संतोष निंभोरकर,पोउपनि.सर्वेश बेलसरे व सर्व LCB चे अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.

#Crime News.#Action by LCB Chandrapur.

                            $$$$$$$$$$$$$$$$$$$$$