Action Against Cattle Transportation : गोवंश जनावरांच्या अवैधरित्या वाहतुकीवर LCB ची कारवाई!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार 12 एप्रिल रोजी प्रोव्हीशन,जुगार रेड,दुचाकी चोरी व घरफोडी गुन्ह्यातील आरोपीतांना चेक करणे तसेच अवैधरित्या जनावर वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करणे कामी चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलींगवर असतांना मुखबीरच्या खबरेवरून पडोली ते घुग्घुस जाणाऱ्या मार्गावरील दत्त मंदिर जवळ,खुटाळा चंद्रपुर येथे 1 अशोक लॅलेन्ड कंपनीचे ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावर वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करुन 27 जनावरांना ताब्यात घेवून एकूण 30 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.एका आरोपीला अटक करण्यात आली असून 5 जण फरार आहे.सर्वांविरुद्ध पोलीस स्टेशन पडोली,येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.जनावरांना प्यार फाउंडेशन चंद्रपूर येथे पाठवण्यात आले असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.

                                       'आरोपींची नावे.' 

         दानिश अब्दुल हमीद कुरेशी वयवर्ष 22 रा.व्याहाड खुर्द,ता. सावली जि.चंद्रपूर.समीर उर्फ ​​सोहेल रा.गोयगाव ता.वांकडी जि. आसिफाबाद(तेलंगण).सादीक कुरेशी रा.गडचांदूर.समीर खान मुसावीर खान रा.राजुरा.अजीम उर्फ ​​अजू शेख रा.कागजनगर जि.कागजनगर(तेलंगणा)आणि ट्रक चालक-मालक.

                                         'जप्त मुद्देमाल.'

एक जुनी वापरती अशोक लॅलेन्ड कंपनीचे ट्रक क्र.AP/07/TU/ 3499,किं.अं.20 लाख,पांढऱ्या रंगाची एक जुना वापरती मारुती स्वफ्ट डिझायर कार क्र.MH/33/A/5760,कि.अं.5 लाख, 27 नग जनावरे(गाय 17,बैल 10),प्रत्येकी किं.अं.20 हजार प्रमाणे किं.5 लाख,40 हजार,2 मोबाईल 30 हजार,असे एकूण 30 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,पोलीस स्टॉफ पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा.सतिश अवथरे,पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा.दिपक डोंगरे,पोहवा.इम्रान खान,पोअं.हिरालाल गुप्ता, पोअं.किशोर वाकाटे,पोअं.शशांक बदामवार,पोशि.सुमीत बरडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर तसेच पोहवा.कार्तीक खनके, पोअं.राहुल पोंदे,सायबर सेल चंदपूर,येथील अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.

#Action Against Cattle Transportation. #Chandrapur District Crime News.

                             $$$$$$$$$$$$$$$$$$$$