Gadchandur : लायन्स क्लब चंद्रपूर,महाकाली इंटरनॅशनल, महावीर इंटरनॅशनल आणि डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बहुउद्देशीय संयुक्त विद्यमाने मागील जवळपास 20 वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. “जनसेवेचा वसा,जनसामान्यांच्या आरोग्याचा ध्यास” या ब्रिदवाक्य प्रमाणे समाजातील गोरगरीब,गरजू,शोषित,पिडीतांना निःशुल्क सेवा मिळावी,याचा लाभ त्यांना मिळावा,'रुग्ण सेवा, हिच ईश्वर सेवा' हा यामागचा उद्देश असल्याची भावना संबंधीतांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी स्थानिक महात्मा गांधी विद्यालय येथे आरोग्य शिबीर संपन्न झाली.यामध्ये सेवाग्राम येथील नेत्र तपासणी तज्ञ डॉ.शुकला आणि त्याची संपूर्ण टीम याठिकाणी आली होती.यावेळी जवळपास 126 पुरुष आणि 121 महिलांनी आपली नेत्र चिकित्सा करून घेतली.100 रुग्ण पात्र ठरले.त्या सर्वांची सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज (14 मार्च)रोजी तपासणीसाठी बोलावून त्यांना नवीन चश्मे, औषधी मोफत देण्यात आले.सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी संस्थाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.परिसरातील अशाप्रकारच्या रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,अशी विनंती वजा आवाहन श्यामाप्रसाद मुखर्जी संस्थेचे सचिव तथा कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांनी केले आहे.
#Dr.Shyama Prasad Mukherjee. #Aarogya Shibir in Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
