Smuggling of Cattle : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस ॲक्शन मोडवर!| Marathi News.

News@Crime...

    Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मुल,गडचांदूर,ब्रम्हपुरी,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस अ‍ॅक्शन मोडवर असून गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीवर धडक कारवाईची मालिका सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर 30 जानेवारी रोजी गोंडपिपरी पोलिसांनी गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीवर कारवाई करत 30 जनावरांची सुटका केली आणि 17 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

         मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोंडपिंपरी पोलिसांनी आपल्या पोस्टे हद्दीत नाकाबंदी करून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या एका कंटेनरला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये 30 नग बैल अमानुष रित्या भरुन दिसून आले.सदर जनावरांची तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याचे कळते.यावरून ट्रक चालक संजय महादेव पानसे वयवर्ष 36 रा.नारीमाळा कॉलनी नागपूर,याला अटक करण्यात आली असून फरार असलेले आरोपी झनकलाल उर्फ लंबू हदुयसिंग मरकाम रा.नारी रोड नालंदा नगर उप्पाळवाडी नागपूर,वाहन मालक मुज्जमील जमील कुरेशी रा.नागपुर,यांच्याविरुद्ध गोंडपिंपरी पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून 30 नग गोवंशीय जनावरे किं.अं.5 लाख,85 हजार, एक आयशर कंटेनर क्र.HR/69/S/9634 किं.अं.12 लाख, असा एकूण 17 लाख,85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. रमेश हत्तीगोटे,पोहवा.विलास कोवे,पोअं.सचिन गायकवाड चासफो.पुनेश्वर कुळमेथे पोस्टे गोंडपिपरी तसेच LCB चे पोउपनि.सर्वेश बेलसरे,सफौ.स्वामीदार चालेकर,पोहवा. किशोर वैरागडे,पोहवा.जयसिंह,पोअं.गोपीनाथ नरोटे यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News Update. #Smuggling of Cattle.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$