Gadchandur : नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांची निवड करण्यासाठी 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सभेसाठी येण्याचे निमंत्रण नगराध्यक्षांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले होते.भाजपचे नगरसेवक जेव्हा त्याठिकाणी हजर झाले तेव्हा अजबच कारभार दिसून आला.
'नेमकं काय घडलं सभागृहात.'
भाजप नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, आम्ही भाजपचे 8 ही महिला,पुरुष नगरसेवक नियोजित वेळेत सभागृहात पोहोचलो.तेव्हा सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कौतुक सोहळा सुरू होता. बाहेर गाव आणि शहरातील त्यांचे समर्थक खुर्च्यांवर बसले होते.सभागृह खचाखच भरून होता.आम्हाला आत जाण्यासाठी सुद्धा रस्ता मिळत नव्हता,जणू हे आम्हाला जाणूनबुजून आत येण्यास मज्जाव करत असल्याची शंका आम्हाला आली.यानंतर आम्ही कसेबसे आत शिरलो. आतमध्ये आम्हाला बसण्यासाठी सुद्धा आसन व्यवस्था नव्हती.हे पाहून आमचा संताप अनावर झाला.कारण आमचे गटनेते सतीश बेतावार,हे उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार होते.सभागृह सारख्या महत्वाच्या ठिकाणी नगरसेवक असायला पाहिजे,परंतु तेथे उपऱ्यांनी बस्तान मांडले होते.हे पाहून आम्ही 8 ही महिला,पुरुष नगरसेवक, यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला.
वास्तविक पाहता ही सभा पिठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी आयोजित केली होती.तर सभा घ्यायला पाहिजे होती.कौतुक सोहळा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा घेता आला असता.त्यांनी विरोधी नगरसेवकांना अपमानित करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे सिद्ध होत आहे.दरम्यान भाजपचे 8 ही नगरसेवक सभागृह सोडून जात असताना मुख्याधिकाऱ्यांनी लगेच दिलगिरी व्यक्त करत नवनिर्वाचित नगरसेवक वगळता इतर सर्वांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले.आणि सभागृहाचे कामकाज सुरू झाले राजुरा येथून आलेले ताजणे समर्थक भाजपचे अरूण मस्की,राजुरा न.प.चे नगराध्यक्ष अरुण धोटे,माजी जि.प. सभापती तथा शेतकरी संघटनेचे नेते विलास धांडे,शेतकरी संघटनेचे नेते निलकंठ कोरांगे,दिपक चटप,डॉ.ठाकरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव बावणे, महादेव जैस्वाल,संदीप शेरकी,कॉंग्रेसचे विवेक येरणे, शेतकरी संघटनेचे महादेव नागभिडकर यांच्यासह ताजणे पॅनल आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी सभागृहात सुरू असलेल्या कौतुक सोहळ्यात उपस्थिती होती.
भाजपच्या रणरागिणी नगरसेविका आणि धडाकेबाज नगरसेवकांनी पहिल्याच दिवशी सभेत दाखवलेली विरोधी पक्षाची झलक पाहून उपस्थित मंडळी अक्षरशः थक्क झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.यासर्व घडामोडी बघता सुरुवात जर अशी तर शेवट काय असेल! हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार,हे मात्र नक्की.
'काय म्हणाले बेतावार आणि उपलेंचवार'
सदर सभागृह नवनियुक्त नगरसेवकांच्या सभेसाठी होते. सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांसाठी नव्हते? हे नियमबाह्य काम नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी,यांनी केल्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवला.महिला रणरागिणी नगरसेविकांनी अक्षरशः सभागृह दणाणून सोडले.आणि जागा नसल्यामुळे ते बाहेर पडले.शेवटी मुख्याधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त केली. नगरसेवकांऐवजी सभागृहात उपस्थित सर्वांना बाहेर काढले आणि भाजपच्या नगरसेवकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली.हे काम एक वाजेच्या पहेले व्हायला पाहिजे होते.मात्र,यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हा प्रकार घडला.मुख्याधिकारी साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली खरी पण,भविष्यात असे कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही,याची दखल नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी,यांनी घ्यावी.एक वाजताची जेव्हा सभा होती तेव्हा त्यांनी सभागृह खाली करायला पाहिजे होते.कौतुक सोहळा सभेनंतर घेता आला असता.म्हणजे महत्वाच्या मिटींग पेक्षा कौतुक सोहळ्यात यांचा रस होता.यावरून सिद्ध होते.असे परखड मत भाजपचे गटनेते सतीश बेतावार आणि स्विकृत सदस्य सतिश उपलेंचवार यांनी 'कोरपना Live' ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
#Gadchandur NP Election.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
